असे घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड

मित्रानो काय तुमच्या घरातले कुणाचे नाव  रेशन कार्ड वरती नाव  टाकायचे राहिले ?  लोकडाऊन मुळे  बाहेर जाणे शक्य नाही तर  मग आता  घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं




 जसे कि मित्रानो आपल्याला माहिती आहे नुकतीच केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची बाकी  राहिली असल्यास ती कशी करायची,  रेशन कार्ड कसे अपडेट करायचे ते जाणून घेऊया ,प्रथमतः हे करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागेल हे जाणून  घेऊ या .

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी 'या' कागदपत्रांची असते गरज :-

रेशन कार्डमध्ये घरातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणं आवश्यक  आहे. याची एक झेरॉक्स कॉपी  आणि ओरिजिनल कॉपी असावी. तसेच व्यक्तीचा (ज्याचे नावाची नोंद करायची आहे ती व्यक्ती ) जन्माचा दाखला आणि आईवडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.

                                              घरामध्ये लग्न करून आलेल्या सुनेचं रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल तर तिचं आधार कार्ड आणि पतीच्या रेशन कार्डची झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. यासोबतच माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचं प्रमाणपत्र देखील असावं.


 ऑनलाईन माहिती घरबसल्या कशी अपडेट करावी :-

  • घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. 

  • लॉगिन आयडी तयार केल्यावर वेबसाईटच्या होमपेजवर आपल्या नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

  • ओपन झालेल्या फॉर्ममध्ये कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा. 

  • फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा. 

  • फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ज्याच्यामदतीने नंतर फॉर्म ट्रॅक करू शकता.

  • फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकारी  पडताळणी  करतील. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म स्वीकृत  करण्यात येईल आणि पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.


तर अश्या प्रकारे आपण घरी बसून आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड वर नोंदवू शकतो , आशा करतो कि आपल्याला हि पोस्ट नक्की आवडली असेल ,आपली प्रतिक्रिया नक्की कळवा ,

Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم