मोबाइलमध्ये अंतर्गत स्टोरेज (internal storage) कसे वाढवायचे How to increase internal storage in mobile -in marathi

मोबाइलमध्ये अंतर्गत स्टोरेज (internal storage) कसे वाढवायचे
How to increase internal storage in mobile -in marathi


मित्रानो आपण Android मोबाइल वापरकर्ता नक्कीच असाल  आणि आपल्या मोबाइलमध्ये कमी अंतर्गत स्टोरेज म्हणजेच फोनची मेमरी कमी असेल तर आपल्याला मोबाइलमध्ये अंतर्गत स्टोरेज कमी असण्याची समस्या नक्कीच येत असेल (अपुरा स्टोरेज) हा संदेश फोनमध्ये वारंवार येत राहतो.  ज्यामुळे आपणं अस्वस्थ होतो किंवा जेव्हा आपण  Google प्ले स्टोअर वरून एखादे मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करायला गेलो कि आपल्याला  एक एर्रोर  दिसतो जरासे कि  अँप डाउनलोड  करू शकत नाही,  आजच्या या लेखात आपण आपल्या Android मोबाइलमध्ये मेमोरी कशी वाढवावी हे पाहणार आहे त्यामुळे पोस्ट पूर्ण वाचा ,चाला तर सुरुवात करूया ,




या साठी खालील काही गोष्ट्टी विचारात घ्याव्या लागतील


  • मोबाइल डेटाचा बॅक अप घ्या

मोबाईलमध्ये अंतर्गत मेमोरी वाढविण्यापूर्वी, सर्वप्रथम आपल्या मोबाइलचा डेटा बॅकअप घ्या , तो डेटा आपल्या मेमरी कार्डमध्ये आहे की अंतर्गत स्टोरेजमध्ये आहे हे तपासून घ्ह्या , प्रथम दुसर्‍या मेमरी कार्डमध्ये किंवा आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉप सिस्टममध्ये बॅकअप घ्या. या प्रक्रियेत आपले SD कार्ड अंतर्गत मेमोरी म्हणून का वापरावे, तर आपला मेमरी कार्ड डेटा हटविला जाऊ शकतो.



  • मोबाईल रूट करा .

जर आपल्याला आपल्या मोबाइलचे मेमरी कार्ड अंतर्गत स्टोरेज म्हणून वापरायचे असेल तर यासाठी मोबाईल रूट असणे खूप महत्वाचे आहे, या प्रक्रियेमध्ये आपल्याला मोबाइल रुट झाल्यानंतरच पुढील गोष्टी करणे शक्य आहे , म्हणून जर तुमचा मोबाइल रूट  नसेल, तर तुमच्या मोबाईलवरच रूट करा तरच तुम्ही पुढील प्रक्रिया  करू शकता. त्या नंतर Link2SD नावाचे अ‍ॅप डाउनलोड करा

अ‍ॅप डाउनलोड करा


  • अ‍ॅप उघडा आणि रूट परवानगी द्या

आपण हा अ‍ॅप दडोवनलोड  करताच, नंतर तो उघडा, आपण Link2SD अ‍ॅप उघडताच ते आपल्याकडून रूट  परवानगी विचारेल, त्यानंतर आपल्याला परवानगी द्यावी लागेल, त्यानंतर आपल्याला एसडी कार्डची फाइल सिस्टम निवडावी लागेल, नंतर हा पर्याय मुख्य Ext2 हा पर्याय निवडा आणि ओके वर क्लिक करा


  • आता multiple-select पर्याय निवडा

फाइल सिस्टम सिलेक्ट करताच, तुम्हाला मल्टि-सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला जे अँप मोबाईल. मधून सद कार्ड मध्ये ठेवायचे आहे ते निवड करा ,  त्यानंतर आपल्याकडे पुन्हा उजव्या बाजूला तीन बिंदू असतील, त्यावर पुन्हा क्लिक करा आणि आता तुम्हाला मूव्ह टू एसडी कार्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर ओके क्लिक करा, तुम्ही जे अँप मोबाईल मध्ये ठ्वलले होते ते सर्व अँप तुमच्या sd. कार्ड मध्ये मोव्ह होऊन आपला मोबाईल फ्री होईल , अधिक समजावे म्हणून खालील प्रमाणे पर्याय निवड करा

  1. तीन डॉट लाइन वर क्लिक करा
  2. multiple select वर क्लिक करा
  3. आता अ‍ॅप्स निवडा
  4. वरील तीन डॉट लाइनवर पुन्हा क्लिक करा
  5. आता SD कार्ड वर जा हा  पर्याय निवडा
  6. आता ओके क्लिक करा.

आहे ना सोपे तर मित्रानो आशा करतो कि हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल ,

Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم