चाणक्य नीति : या सवयी च्या लोकांवर एकदिवस नक्की येते गरिबी
कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च।सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चतिश्रीर्यदि चक्रपाणि:।।
नमस्कार मित्रानो. स्वागत आहे आपले mtechmarathi.in या साईट वरती. जसे कि मित्रानो आपल्या सर्वाना माहिती आहे कि चाणक्य हे दुनियेतील चतुर आणि बुद्धिमान व्यक्तींमधून एक आहेत. त्यांनी आपल्या चाणक्य निती मध्ये खूप काही गोष्टी लिहिल्या आहेत ज्या नक्कीच खऱ्या आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति मध्ये माणसांचे काही सवयी बद्दल लिहिले आहे. ज्या सवयी त्या व्यक्तीला गरीब बनवण्यास कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे जीवनातील संतुलन देखील बिघडले जातात. तर चला जाणून घेऊ त्या सवयी विषयी.
खराब कपडे परिधान करणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या बोलण्यानुसार खराब कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. जी लोक गंदगी मध्ये राहतात, आपल्या आसपास साफसफाई करत नाहीत अश्या व्यक्तीच्या हातात आणि घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. आणि असे लोक कायम गरिबी मध्ये आपले जीवन जगात असतात.
दात स्वच्छ ना करणारी व्यक्ती
कडू शब्द बोलणारी व्यक्ती
जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाशी कटू शब्दामध्ये बोलतात अशी व्यक्ती किंवा लोक कधीच श्रीमंती गाठू शकत नाहीत. चाणक्य म्हणतात कि प्रत्येक शब्दातून किंवा कटू शब्दाने समोरच्याला दुःख देणाऱ्या लोकांना लक्ष्मी कधी प्रसन्न होत नाही. त्याच बरोबर अश्या व्यक्तीचे मैत्री नाते कधीच जडत नाहीत. आणि असे लोक कायम वैरी लोकांच्या सानिध्यात असतात.
बेईमानी करणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जी लोक बैमानीने आपले जीवन जगतात अशी लोक कधीच आपल्या जीवनात सुखी आणि श्रीमंती पाहू शकत नाहीत. अश्या लोकांच्या जीवनात कायम धोका संभव असतो. अश्या लोकांवरती लक्ष्मी नेहमी नाराज असते.
भेकेपेक्षा जास्त अन्न खाणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य सांगतात कि जी लोक आपल्या भेकेपेक्षा जास्त अन्न खातात अश्या लोकांवर लक्ष्मी कायम नाराज असते. आणि असे लोक आपल्या संपूर्ण जीवनात नेहमी गरिबीचा सामना करत असतात. कारण दरिद्री व्यक्तीला कायम गरिबी कडे ढकलत असते. अशी लोक कायम अस्वस्थ असतात
إرسال تعليق
thank you for your feedback