IAS च्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे विचित्र प्रश्न ! तुम्ही देऊ शकता का उत्तर?

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेबसाईट वर आमंत्रित करतो, कारण इथे आपणाला आपल्या अभ्यासात भर टाकण्यासाठी  प्रश्नसंच, चालू घडामोडी, नौकरी जाहिराती अशी अनेक माहिती पुरवत असतो. आपण पण आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शामिल करा.


IAS च्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे विचित्र प्रश्न !


मित्रानो नुकताच UPCS चा निकाल हाती लागला ते आपण पाहिले. आणि त्या परीक्षेत किती तरी विद्यार्थी उत्तीर्ण झाले  UPSC उत्तीर्ण होणे खूप मोठी गोष्ट असते. आपण विचारही करू शकत नाही अशी ही परीक्षा मुले सहज पास करतात. वाटते तेवढे सोपे या परीक्षेचे नसते. आता तुम्ही म्हणाल कि असे काय अवघड असते त्यात. तर मित्रानो आज UPSC च्या मुलाखती मध्ये विचारले जाणारे काही प्रश्न आपण या लेखात पाहणार आहोत. असे प्रश्न ज्याचे उत्तर एक तर आपण चुकीचेच देणार किंवा त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला काही दिवस देखील लागू शकतात. परंतु असे गुंतागुंतीचे आणि विचित्र प्रश्न upsc पास मुले कसे देतात ते आपण पाहूया. पहा तुम्ही प्रयत्न करून. त्यानंतर तुमच्या लक्ष्यात येईल कि का इतकी कठीण असते ही परीक्षा, तर चला सुरूवात करूया आजच्या post ला.

प्रश्न -तुम्ही IAS अधिकारी का होऊ इच्छिता

मित्रानो हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. हा प्रश्न या साठी विचारला जातो. कि जेणेकरून या व्यक्तीचा नेमका IAS होण्याचा उद्देश काय आहे. त्याच्याकडे अश्या काय कल्पना आहे कि ज्यामुळे या व्यक्तीला सिव्हिल सर्व्हिस मध्ये काम करता येईल किंवा योग्य राहील. त्यामुळे UPSC क्लास घेणाऱ्या सर्व संस्था या प्रश्नाची प्रत्येक विध्यार्थी कडून तयारी करून घेत असतात. हा प्रत्येकाला विचारला जाणारा प्रश्न आहे.

प्रश्न - जर मी तुमच्या बहिणी सोबत पळून गेलो तर तुम्ही काय कराल.

उत्तर :- सर जर असे झाले मला काहीच वाटणार नाही कारण तुम्ही माझे दाजी आणि माझ्या बहिणीचे नवरा असाल. बायको सोबत पळून जाणे अयोग्य नाही.

हा प्रश्न या करता विचारला जातो कि समोरील व्यक्ती कितपत विचार करतो कि राग येऊन विचित्र व्यवहार करतो. कारण सिव्हिल सर्व्हिस करताना राग नियंत्रणात ठेऊन विचार पूर्वक निर्णय घ्यावे लागतात.

प्रश्न - एका सकाळी तुम्हाला जाग आली आणि तुम्हाला असे समजले कि तुम्ही गर्भवती आहात तर काय होईल.

उत्तर :- सर मला आनंदच होईल कारण माझे त्यावेळी लग्न झालेले असेल.

हा प्रश्न उमेदवार आश्चर्यजनक गोष्टीवर कशी प्रक्रिया देतात त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा फक्त नकारात्मक विचार ना होता नकारात्मक दिसणाऱ्या गोष्टीला सकारात्मक कसे बनवले जाते हे तपासण्यासाठी विचारला जातो.

प्रश्न - एखादी व्यक्ती आठ दिवस बिना झोपेचा कसा राहू शकतो.

उत्तर - सर कारण तो रात्री झोपतो.

हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे हा उमेदवार किती विचारपूर्वक गोष्टी समजावून घेतो याची प्रचिती यावी.

प्रश्न - एक सफरचंद मधोमध कापले तर त्या सफरचंदाची फोड  कश्या सारखी दिसेल.

उत्तर -  कापलेल्या सफरचंदाच्या दुसऱ्या फोडी सारखी

प्रश्न - एका भिंतीला बनवण्यासाठी 5 जणांना 10 दिवस लागतात तर तीच भिंत 10 मजूर किती दिवसात बनवू शकतात.

उत्तर :- सर अजिबात वेळ लागणार नाही कारण ती भिंत आधीच बनवलेली आहे. मग पुन्हा बनवण्याची गरजच नाही.

असे काही प्रश्न IAS च्या मुलाखती मध्ये विचारले जातात.


उमेदवार आपल्या निर्णयावर किती ठाम आहे चाचणी कशी केली जाते ते खालील उदाहरणाद्वारे पाहूया.

उमेदवार आणि मुलाखती घेणारी व्यक्ती बसलेली मुलाखत चालू असते  उमेदवाराने इतर सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सुरेख दिलेली असतात . आणि अचानक एक व्यक्ती येऊन टेबल वरती 2 कप चहा ठेवतो.

मुलाखती घेणारी व्यक्ती उमेदवाराला चहा घ्या असे बोलते. पण उमेदवार नाही सर थँक्स म्हणून शांत बसतो.
मुलाखत घेणारी व्यक्ती पुन्हा उमेदवाराला चहा साठी आग्रह करते उमेदवार पुन्हा नकारार्थी उत्तर देतो.

मुलाखत घेणारी व्यक्ती पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवाराला चहा साठी आग्रह करते आणि तिसऱ्या वेळ मात्र उमेदवार ओके सर म्हणून चहाचा कप उचलते.

आणि याच गोष्टी मुले तो उमेदवार रिजेक्ट केला जातो. काय कारण असावे.

( हा प्रश्न उमेदवार आपल्या निर्णयावर किती ठाम आहे याची प्रचिती करून देतो )

कारण :- कारण असे आहे कि IAS ऑफिसर हा एक जबाबदार व्यक्ती असतो. समजा एखाद्या कामासाठी तुम्हाला कोणी पैस्याची ऑफर(लाच ) दिली तर रक्कम ( लाच ) कमी आहे म्हणून तुम्ही नाही बोलू शकता . पण रक्कम वाढवली किंवा तुम्हाला जास्तच आग्रह केला तर तुम्ही तुमचा विचार बदलू शकता. म्हणून त्या उमेदवाराला रिजेक्ट केले गेले.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم