धक्कादायक ! होमगार्ड पठ्याने हळद आणि कापसाच्या पिकातच केली गांज्याची शेती

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

 धक्कादायक ! होमगार्ड पठ्याने हळद आणि कापसाच्या पिकातच केली गांज्याची शेती




औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी छापे मारून गांज्याची शेती करणार्यांना अटक केली असून. रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी औंढा तालुक्यात धारखेडा येथे होमगार्ड म्हणून असणाऱ्या  एकाला कापूस आणि हळदीच्या पिकामध्ये गांजाची शेती केली म्हणून अटक करण्यात आली आहे.


शनिवारी औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत गांजाची शेती करणार्यांना अटक केली आहे. धारखेडा येथे गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जगदीश भंडारवार यांना मिळाली होती. याच माहितीच्या अनुशंघाने ही कारवाई केल्याचे समजत आहे. या माहितीनुसार धारखेडा येथील वसंत कराळे यांच्या शेतामध्ये पोलिसांनी आपल्या पथकासोबत छाप टाकल्यानंतर शेतात असणाऱ्या कापूस व हळदीच्या अंतर्गत पिकामध्ये गांजाची शेती केली जातं असल्याचे या पथकाला दिसून आले.


संपूर्ण शेताची पाहणी केली असता गांज्याची सुमारे 50 ते 60 झाडे दिसून आली. सदर झाडांची उंची चार ते सहा फुटापर्यंत असल्याचे देखील दिसून आले. सदर शेतात आणखी झाडें आहेत का याची चौकशी अजून सुरु असून सदर व्यक्तीवर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. होमगार्ड पदावर काम करणारी व्यक्ती चक्क गांजाची शेती करतो ही घटना आणि धाडस औंढा तालुक्यात दिसून आला आहे. अजून इतर ठिकाणी अशी काही शेती केली जाते आहे का?  याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

 


आमच्या विचारमंच आणि महा-नौकरी या Telegram channel ला जॉईन करण्यासाठी खलील link वरती क्लिक करा.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم