सिम कार्ड कोणाच्या नावावरती रजिस्टर आहे कसे पहावे?

सिम कार्ड कोणाच्या नावावरती रजिस्टर आहे कसे पहावे? 

Mtechmarathi-new sim



 काही वेळेस आपल्याला सिम कार्ड कोणाच्या नावावर ती आहे हे तपासण्याची खूप गरज पडते. तर आज आम्ही आपल्याला सांगणार आहे की सिम कार्ड कोणाच्या नावावर रजिस्टर आहे हे कसे तपासावे. ज्याचा वापर करून तुम्ही सिम कार्ड कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकतात. काही वेळेस आपण हे पण विसरून जातो की आपल्या मोबाईल मध्ये असणारे सिम कार्ड आपल्या नावावर ती आहे की आपल्या कुटुंबातील इतर कोणाच्या नावावरती आहे. 

 अशावेळेस आपण या माहितीचा वापर करून आपण हे माहिती करू शकतो की आपल्या मोबाईल मध्ये असणारे सिम कार्ड कुणाच्या नावावर किती आहे. या माहितीच्या आधारे आपण नवीन सिमकार्ड घेत या वेळी देखील चौकशी करू शकता की आपण घेत असलेले सिम कार्ड या अगोदरच कोणाच्या नावावर ती रजिस्टर तर नाही ना. 

 सिम कार्ड कोणाच्या नावावर रजिस्टर आहे कसे तपासावे. 


 आपण ज्या कंपनीच्या सिमकार्ड च्या नावाची रजिस्टर ची चौकशी करू इच्छित असाल त्या कंपनीचे मोबाईल ॲप्स आपल्याला डाऊनलोड करावे लागेल. त्याचप्रमाणे आपण इतर कंपन्यांचे एअरटेल वोडाफोन जिओ अशा कंपन्यांचे ॲप्स डाऊनलोड करून आपण सिम कार्ड कोणाच्या नावावर रजिस्टर आहे हे तपासू शकतो. चे सर्व एप्लीकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती भेटून जातील. हे ॲप्लिकेशन तुम्ही अगदी मोफत डाऊनलोड करू शकतात. तुम्हाला सांगू इच्छितो की ही सेवा फक्त बीएसएनएल साठी उपलब्ध नाही. 

 सर्व कंपन्यांच्या ॲप्स ची प्रोसेस जवळपास सारखीच आहे परंतु आज आपण आयडिया कंपनीच्या ॲप्स बद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला इतर कुठल्या कंपनीचा सिम कार्ड बद्दल माहिती घ्यावयाची असेल तर आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. 

सिम कार्ड रजिस्ट्रेशन ची संपूर्ण माहिती. 


सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती जाऊन माय आयडिया ॲप्स डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन द्यावे लागतील. 

 यानंतर तुम्हाला तुमच्या या ॲपमध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्यावर ती तुम्हाला एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड प्राप्त होईल. 

 ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला वरती उजव्या साईटला सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे ते नाव तुम्हाला दिसेल. 

 याप्रकारे आपण कोणत्याही सिम कार्ड चे नाव किंवा ते सिम कार्ड कोणाच्या नावावर ती रजिस्टर आहे हे तपासू शकतो. 

 आपण या ॲपचा वापर करून इतर काही माहिती देखील प्राप्त करू शकतो. जसे की मेसेज डाटा. कॉल हिस्ट्री जी की तुमच्या नंबर वरून केले गेलेले कॉल ची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला दाखवेल. सोबतच तुम्ही इंटरनेट पॅक कशाप्रकारे वापरला आहे याबद्दलची देखील पूर्ण माहिती  तुम्हाला भेटून जाईल. 


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم