जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट ,जगभरात केवळ ४३ लोकांमध्येच आहे हा रक्तगट .

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट ,जगभरात केवळ ४३ लोकांमध्येच आहे हा रक्तगट . 




मित्रानो गोल्डन ब्लड ग्रुपचे नाव ऐकून आपल्याला आश्चर्य तर नक्कीच झाले असेल आणि हे गोल्डन ब्लड मौल्यवान काहीतरी असल्यासारखे नक्कीच वाटेल असेल . परंतु मित्रानो हा एक रक्ताचा दुर्मिळ गट आहे ,जो संपूर्ण जगात फारच कमी आढळून येतो . या रक्तगटाला  सोन्याचे रक्त म्हणतात, त्याचे खरे नाव आरएच नल((Rh null)) असे आहे.

मित्रानो आपण  A , B , O , AB पॉझिटिव्ह - निगेटिव्ह रक्तगटाबद्दल नक्कीच वाचले आणि ऐकले असेल , परंतु आपल्याला माहिती आहे का ?, जगभरातील फारच थोड्या लोकांमध्ये आणखी एक रक्तगट आढळून येतो . थोडक्यात  आपण ज्या रक्तगटा विषयी बोलत आहोत. त्याला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट मानले जाते.म्हणजेच गोल्डन ब्लड . 


गोल्डन ब्लड चे मूळ नाव आरएच नल(Rh null) असून . हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि दुर्मिळ असल्याकारणाने  संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांनी त्याचे नाव गोल्डन ब्लड असे ठेवले आहे. हे रक्त दुर्मिळ असल्यामुळे  आणि कोणत्याही रक्तगटाला ते देऊ शकत असल्याने हे रक्तगट मौल्यवान मानले जाते . 


या गोल्डन रक्ताचे  सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे अँटीजन सापडत नाही. थोडक्यात  हे रक्त कोणत्याही रक्तगटाला दिले तर शरीर ते स्वीकारते.


U.S. Rare Disease Information Center च्या म्हणण्यानुसार, गोल्डन ब्लड ग्रुप अँटिजन रहित असल्याने, ज्या लोकांच्या शरीरात हे रक्त आहे त्यांना अशक्तपणाची जाणवू शकतो . याच कारणामुळे  अशा लोकांची माहिती होताच डॉक्टर त्यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा आणि त्याचबरोबर लोहयुक्त आहाराचा अधिक प्रमाणात समावेश करण्याचा सल्ला देत असतात . 
 
आतापर्यंत संपूर्ण जगभरात केवळ 43 लोकांमध्ये हा रक्तगट आढळला आहे असे एका संशोधनातून समोर आले आहे . हा रक्तगट  ब्राझिल, कोलंबिया, जपान, आयर्लंड आणि अमेरिकेतील लोकांमध्ये दिसून आला आहे . दुर्मिळ असल्यामुळे आणि एकाच रक्तगटाचीच आवश्यकता असल्याने डॉक्टर या लोकांना सतत रक्तदान करण्यास सांगत असतात . जेणेकरून आवश्यकतेनुसार हे रक्त त्यांच्यासाठी वापरता येईल.

जर हि माहिती आपल्याला नवीन वाटली असेल आन आवडली असेल तर कंमेंट आणि SHARE नक्की करा . 


 
==========================================================

         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم