संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
शेतकरी बांधवानो या वर्षी सोयाबीन पेरणी करताय मग हे नक्की वाचा.
1. सोयाबीन पेरणी करताना बिगरमोसमी पावसावर करू नये. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. 2-3 चांगले पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. साधारणत: सहा इंच जमिन ओली झाली असल्यास वाफसा स्थिती आल्यावर 3-5 सेमी खोलीवर पेरणी करावी.शेतकरी बांधवानी पहिल्या पावसावर नंतर लगेच प्रेरणी करू नये . कारण पहिल्या पावसावर पेरणी केल्यास जमिनीतील उष्णता ही कमी न झाल्यामुळे अंकुरलेले बियाणे उष्णतेमुळे जळून जाते व बियाणांची उगवण ही कमी प्रमाणात होते.
2.आपण आपल्या घरचे बियाणे, दुकानातील बियाणे वापरत असाल तर सर्व पोत्यातील बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्या. शेजारच्या शेतकऱ्याचे बियाणे विकत घेऊन पेरणी करत असाल तरीही त्याची उगवण क्षमता तपासणी करून घ्या. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवन क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरा.
3.आपल्याकडे असणाऱ्या बियाणाला पेरणी करण्याअगोदर रायझोबियम व पीएसबी या नत्र व स्फुरद स्थिरीकरण करणाऱ्या खतांची बीजप्रक्रिया करून घ्यावी . यामुळे आपल्या पिकाची उगवण चांगली होऊन पिकास हवेतील नत्र व जमिनीतील स्फुरद या मूलद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रमाणात होते.
4.अठरा इंचावर सोयाबीन पेरणी करावी.
अधिक माहिती साठी किंवा काही अडचण असल्यास कृषि विभागास संपर्क साधावा ही विनंती.कोणत्याही प्रकारचे चुकीचे नियोजन करू नका योग्य पाऊस पडल्यानंतरच बिजप्रक्रिया करून आपण पेरणी करावी.
*कृपया हे आवाहन जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना पाठवून त्यांनाही या बाबींचाअवलंब करण्यास सांगावे ही विनंती. धन्यवाद !
===========================================================
================================================== ========================================
==================================================
========================================
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback