काय आहे ब्लॅक फंगस? कसा होतो? काय आहेत याची लक्षणे?What is black fungus? How is it What are the symptoms?

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

काय आहे ब्लॅक फंगस? कसा होतो? काय आहेत याची लक्षणे?



कोरोनाव्हायरस संपण्याच्या आधीच देशात ब्लॅक फंगस यांसारख्या नवीन रोगाचे/संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. जर आपण कोरोनाव्हायरसचे शिकार झाला असाल तर आपला जीव वाचन्याचा ९० टक्के चान्स आहे, परंतु जर याच फंगसचा संसर्ग झाला तर आपला जगण्याचा चान्स फक्त ५० टक्के आहे.


काय आहे ब्लॅक फंगस ?

शास्त्रज्ञांच्या मते हा काही नवीन प्रकार नाही, या आधीही यांसारख्या फंगसचा संसर्ग सामान्य माणसाला होत होता. परंतु प्रत्येक फंगस वेगळा असतो काही घातक असतात तर काही नसतात. हा फंगस आपल्यास घातक आहे. ब्लॅक फंगस या फंगस रोगाचे शास्त्रीय नाव म्युकॉर्मायोसिस (mukar mayosis) आहे. हा रोग म्युकॉरेज या फॅमिली मुळे होतो, म्हणजे या फॅमिलीतिल फंगस मुळे हा रोग होतो. या प्रकारचे फंगस पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात. मातीमध्ये तसेच सडलेल्या फळांमध्ये व आपल्या दैनिक जा काही सडलेल्या असतात यामध्ये हा हमखास पाहायला मिळतो. या प्रकारचा फंगस नॉर्मल जीवनात आपल्यावर अटॅक करत नाहीत.जा वेळेस आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्या वेळेस हा फंगस आपल्या शरीरात घुसतो व आपल्या शरीरावर पसरतो व आपल्याला हानी पोहचवन्यस सुरवात करतो. जर आपले शरीर तंदुरुस्त असले तर एखाद्या वेळेस हा फंगस आपल्या शरीरात घुसला तरीही आपल्याला कळायचे नाही व तो आपोआपच बरा होईल. परंतु जर आपली रोग प्रतिकारक शक्ती कमजोर असेल, जर आपण तंदुरुस्त नसाल, तर हा आपल्या शरीरावर आपले साम्राज्य गाजवतो व आपल्याला याचा रोगी बनवतो .


रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे:-

कॅन्सर या रोगासाठी घेतली जाणारी कीमोथेरेपी ट्रीटमेंट आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी करू शकते.

मधुमेह आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी करू शकतो.


आपल्या शरीरात कसा घुसतो हा फंगस? :-

  • हवा

जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेत या फंगस चे काही छोटे छोटे spores असतात.

हे spores आपल्या शरीरातील फुप्फुसांमध्ये जाऊन फुफ्फुसांवर अटॅक करतात व आपल्याला या रोगाची लागण होते.

  • अन्न 

जर आपण शिळे अन्न खाल्ले किंवा जर बुरा लागलेली भाकर व इत्यादी यांसारखे काही शिळे खाल्ले तर यांवरील फंगल spores आपल्या शरीरात घुसून पोटावर अटॅक करतात व त्यामुळे आपल्याला या रोगाची लागण होते.

  • जखम

जर आपल्या शरीरावर कुठेही इजा झालेली असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर हा फंगस त्यावर येतो व आपल्या शरीरात शिरतो व आपल्याला याची लागण होते.

परंतु या सर्वांमध्ये जास्त रुग्णांना याची लागण हवेद्वारे होते. हवा हाच एक सामान्य मार्ग आहे ज्यामुळे रुग्णाला याची लागण होते.


याला का  म्हणतात ब्लॅक फंगस ? :-

याची लागण झाल्यावर नाकातील मोकळ्या जागेत किंवा पोकळीत (sinus) या रोगाची लागण होते. हे ठिकाण सगळ्यात सामान्य आहे.यामुळे या ठिकाणी जेव्हा रक्तवाहिन्या बंद पडतात व त्या जाग ची त्वचा ही काळी पडते या त्वचेचा रंग काळा पडतो म्हणून या फंगस ला काळा फंगस किंवा ब्लॅक फंगस असे म्हणतात.


काय आहेत याची लक्षणे कसे ओळखायचे की आपल्याला ब्लॅक फंगस झाला आहे ? :-


  • जर याची आपल्याला लागण झाली तर हे ओळखण्यासाठी ज्या ठिकाणी तो गेला आहे व परिणाम करत आहे किंवा कसा तो वाढत आहे यावर ते अवलंबून असते .

  • जर तो नाकातील पोकळी मध्ये गेला तर आंधळेपणा, दातदुखी, डोकेदुखी, ताप, नाकावर काळे चट्टे यांसारखे लक्षणे बघायला मिळतात.

  • जर तो आपल्या फुफ्फुसांमध्ये शिरला असेल तर आपल्याला छातीमध्ये दुखणे, ताप, खोकला, श्वासामध्ये अडचण व काहीवेळेस उलटी मध्ये रक्त यांसारखी लक्षणे दिसून येतात.

  • जर हा आपल्या त्वचेवर पसरायला लागला किंवा एखाद्या जखमेच्या ठिकाणी पसरायला लागला तर त्या ठिकाणी त्वचा काळी पडायला सुरुवात होते.

  • जर याची पसरण्याची सुरुवात आपल्या पोटा पासून झाली तर यामध्ये आपल्याला पोट दुखी चालू होते, व उलटी तसेच मळमळ होते.

उपचार:- 

याच्या उपचारासाठी अँटीफंगल इंजेक्शन दिले जातात परंतु आजच्या स्थितीला देशात या इंजेक्शनची कमतरता आढळून येत आहे.
म्हणून काही रुग्णांमध्ये ज्या ठिकाणी याची लागण झाली आहे याठिकाणी ऑपरेशन केले जाते व ती जागा काढून टाकली जाते यामध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये जबडा यांसारखे अवयव काढण्यात आले आहेत.
तसेच काही रूग्णांमध्ये डोळे सुद्धा काढण्यात आले आहेत.


कसे वाचायचे यापासून:-

  • या रोगाची लागण न होण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवायचा आहे कारण की हा फंगस म्हणजे ही एक प्रकारची बुरशीच आहे. बुरशी घाणीच्या ठिकाणी जास्त वाढते व पसरते यामुळे आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा.

  • गोळ्या व औषधे डॉक्टरांच्या परवानगीशिवाय खाऊ नका.

  • जास्त गोळ्याचेही सेवन करू नका, जास्त गोळ्यांचे सेवन केल्याने ही आपल्या शरीरात हा फंगस शिरू शकतो.

  • स्वच्छ पाणी प्या किंवा  फिल्टर केलेले पाणी प्या किंवा पाणी उकळून प्या.

*Covid-19*

घरी रहा सुरक्षित रहा
मास्क चा वापर नक्की करा . 
दिवसातून ३ वेळा आपले हात स्वच्छ धुवा. 

===========================================================

         ==================================================
                    ========================================

आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم