संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
आता १ वर्ष राशन मोफत मिळणार, केंद्र शासनाचा मोठा निर्णय | One Year Free Ration Yojna 2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले mtechmarathi. ब्लॉगस्पॉट.com या वेबसाईट वर , मित्रानो आपण जर रेशन कार्डधारक असाल तर आपल्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. काय आहे ती बातमी चला जाणून घेऊया.
आता रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष रेशन फुकट मिळणार आहे.त्या संदर्भात केंद्र शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा होणार आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय NFSA अंतर्गत अन्नधान्यावर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकार पुढील एक वर्षासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे. हा एक मोठा निर्णय माणला जात आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्र सरकार सर्व ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना पुढील एक वर्षासाठी म्हणजे थोडक्यात १ जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य पुरवठा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा ऐत्याहासिक निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकार NFSA अंतर्गत आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अनुदानापोटी, 2 लाख कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करणार आहे. या निर्णयामुळे गरिबांचा आर्थिक ताण कमी होऊन, त्यांना मोठा दिलासा मिळेल, असे पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हा ऐतिहासिक निर्णय असून, प्राधान्यक्रमातील घरांमधील लाभार्थ्यांना या योजनेनुसार , व्यक्तीमागे 5 किलो धान्य मोफत दिले जाणार आहे.तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत, 35 किलो धान्य प्रती कुटुंब, एक वर्षासाठी मोफत दिले जाणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, अनुदानित अन्नधान्य प्रति किलो 3 रुपये तांदूळ,प्रति किलो 2 रुपये गहू आणि 1 रुपये प्रति किलो भरड धान्य लाभार्थ्यांना वाटप केले गेले आहे. लाभार्थ्यांना यापुढेही मोफत धान्य मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.
==================================== =============================== ========================
====================================
===============================
========================
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
إرسال تعليق
thank you for your feedback