मागेल त्याला विहीर ४ लाख रुपये मिळणार अनुदान | vihir anudaan Maharashtra 2022

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

गेल्या काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या उत्तम नियोजनाचा वापर करून प्रत्येक कुटुंब सशक्त करण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात अजूनही ३,७८,५०० विहीरी खोदणे शक्य आहे असे दिसून आले आहे .


मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर (ठिबक आणि तुषार सिंचन ) केला गेला तर मोठ्या प्रमानामध्ये कुटुंबे लखपती होतील व याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र राज्य हे दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीने वाटचाल करेल.
MGNREGA (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ) अंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेले अडथळे दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरीं संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.तर चला पाहूया सविस्तर.

लाभधारकाची निवड :

MGNREGA (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी) अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(ड ) मधील तरतुदीनुसार खाली दिलेल्या प्रवर्गासाठी प्राधान्य क्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

  •  अनुसूचित जमाती क) भटक्या जमाती
  • निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री– कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
  • अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम.
  • 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी.
  • सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा).
  • अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा.

नियम :-

  • लाभार्थ्याकडे कमीतकमी 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • महाराष्ट्र भुजल ( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर आवारामध्ये नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. यामुळे अस्तित्वात असलेले पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर मान्य करु नये.
  • दोन सिंचन विहिरींमधील अंतराची अट (१५० मिटर ) पुढील बाबींना लागू राहणार नाही.
  • दोन सिंचन विहिरीमधील अंतर कमीतकमी 150 मीटर असावे अशी अट असून ही रनऑफ झोन त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मिटर अंतराची अट लागू राहणार नाही.
  • लाभार्थ्यांच्या 7/12 वर या आगोदर विहीरीची नोंद असू नये.
  • लाभार्थ्याकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (ऑनलाईन स्वरूपाचा )
  • एक किंवा एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील परंतु त्यांचे एकूण जमीनीचे क्षेत्र किमान 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • लाभार्थी हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

अश्या प्रकारचे नियम हे लागू केले आहे.

अर्ज करतेवेळी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे.

  1. ७/१२ उतारा जो कि ऑनलाईन असावा.
  2. ८ अ म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला हा दाखला देखील ऑनलाईन असावा.
  3. जॉब कार्ड ची झेरॉक्स प्रत.
  4. एखादी विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशावेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र असावे .



===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या Telegram Channel ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم