असे काढा आपले आभा हेल्थ कार्ड,आता डॉक्टर कडे जाताना जुन्या रिपोर्टची गरज नाही. जाणून घ्या फायदे.| ABHA Card

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? आता डॉक्टर कडे जाताना जुन्या रिपोर्टची गरज नाही. जाणून घ्या फायदे.

आरोग्य विभागातील एक नवी सुरुवात केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड लॉन्च केले आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे कार्ड प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या आरोग्य संबंधित माहिती डिजिटल स्वरूपात जपून ठेवणार आहे या कार्डची नोंदणी करतेवेळी आजाराने त्यावर उपचाराची माहिती घेतली जाणार आहे.

    आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय?

    आभा हे एक डिजिटल प्रकारची कार्ड आहे, यामध्ये कोणत्याही रुग्णाच्या आजाराची माहिती आणि आणि त्या व्यक्तीवर केलेल्या उपचाराची नोंद ठेवली जाणार आहे. यामुळे रुग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासणी आणखी सोपे होणार आहे. 14 अंकी असणाऱ्या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा एक युनिक आयडी तयार केला जाणार आहे.

    काय आहे आभा कार्ड चा फायदा?

    यापूर्वी आपण कोणताही आजार किंवा व्याधीसाठी डॉक्टरकडे जात होतो. या अगोदर तुम्ही कुठे उपचार घेत होतात, जर घेत असाल तर त्याचा रिपोर्ट दाखवा अशी विचारणा समोरून केली जात होती. परंतु आभा कार्ड मुळे हा त्रास देखील आपला वाचणार आहे. कारण या कार्डमध्ये तुम्हाला असणाऱ्या व्याधी तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींची नोंद आणि तुमच्यावर घेतलेला उपचाराची संपूर्ण माहिती यामध्ये असणार आहे या कार्डमुळे कोणतीही व्यक्ती देशांमध्ये कोणत्याही शहरात योग्य तो उपचार घेऊ शकणार आहे.

    आभा कार्ड कसे काढाल?

    तसे पाहायला गेले तर जन आरोग्य योजना कार्यालय तर्फे रुग्णालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये या कार्डसाठीची नोंद सुरू झाली आहे. जर आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला खालील प्रकारची प्रोसेस करावी लागेल. तर चला जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस.

    असे काढा आपले आभा कार्ड!

    सर्वप्रथम आपल्याला एनडीएचएम डॉट जीओव्ही डॉट इन (ndhm.gov.in) या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
    ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय खुले होतील. आपण या दोन पर्यायांपैकी कुठलाही एका पर्यायाचा वापर करून आपले आभा कार्ड तयार करू शकता.

    दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला यामध्ये आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असे दोन पर्याय दिसून येतील. जर आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असेल आणि तो मोबाईल क्रमांका आपल्याजवळ असेल तर आधार कार्ड या पर्यायचा तुम्ही वापर करू शकता. जर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळील आधार सेंटर मध्ये जाऊन आपण तो अपडेट करून घ्या.

    जर आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आधार कार्ड या पर्यावरण क्लिक करून आपला आधार कार्ड नंबर टाका. आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.

    आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड आपल्याला प्राप्त होईल. तो ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

    आपण या दोन स्टेप पूर्ण केल्यानंतर लगेचच आपले आभा कार्ड तयार होऊन येईल. यामध्ये आपला 14 अंकी आयडी दिसून येईल. हे कार्ड तुम्ही डाउनलोड देखील करू शकता किंवा प्रिंट देखील काढू शकता त्याचबरोबर यामध्ये 80 पर्याय दिलेले आहे तसेच मोबाईल नंबर बदल करणे. आपण यांचा वापर करून हवा तो बदल करू शकतो.



    तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले आभा कार्ड ही दोन मिनिटांमध्ये तयार करू शकतात. ढोलकी साथ आपल्याला या कार्डची भरपूर काही गरज पडणार आहे यामुळे या कार्डला आपण जपून ठेवा.

    आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आणि नवीन उपडेट आपल्या मोबाईल वर विनामूल्य प्राप्त करण्यासाठी आपण आमच्याशी खालील माध्यमाद्वारे जोडले जाऊ शकता.

    What's App ------------»   Join करा.


    Facebook ---------------»  Join करा.


    Telegram -----------------»  Join करा.



    Post a Comment

    thank you for your feedback

    أحدث أقدم