भारतामधील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर WHO चा इशारा.

 संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.blogspot.com - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट.


भारतामधील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर WHO चा इशारा.

काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप चे सेवन केल्याने १९ लहान मुलांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे . मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने तयार केलेल्या दोन कफ सिरप पाजल्यामुळे ही मोठी घटना घडली असे बोलले जात आहे . याच पार्श्वभूमीवर WHO (जागतिक आरोग्य संघटना ) ने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे.

कोणते आहेत हे जीवघेणे सिरप?

स्थानिक उत्तर प्रदेशच्या मारयॉन बायोटेक कंपनीने तयार केलेले Ambronol आणि DOK-1 Max हे दोन कफ सिरपबनवले जाते. या दोन फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल हे दोन घटक योग्य प्रमाणात नसल्याचे दिसून आले आहे. या कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरती दिलेले दोन कफ सिरप देणे बंद करावे , असे आवाहन देखील केले आहे.

नेमकं काय घडलं होतं उझबेकिस्तानमध्ये?

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मारियॉन बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले होते .श्वसनाच्या आजारामुळे या मुलांचा मृत्यू झाला असे समजले असता मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याअगोदर त्यांच्या पालकांकडून Dok-1 Max Syrup दिले असल्याचे समजले होते.

मृत मुलांना मृत्यूपूर्वी २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आल्याचे देखील समजले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले .उझबेकिस्तानने या घटनेची दखल आरोग्य मंत्रालयाने देखील घेतली होती.


जर आपल्याकडे देखील लहान मुले असतील आणि आपण देखील त्यांना सिरप देत असाल तर सर्वप्रथम खात्री करून घ्या कि वरील दिलेले हे दोन सिरप तर आपण आपल्या मुलांना देत नाही ना.त्याचबरोबर या दोन सिरपचा वापर टाळा असे देखील WHO ने म्हंटले आहे.


आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आणि नवीन उपडेट आपल्या मोबाईल वर विनामूल्य प्राप्त करण्यासाठी आपण आमच्याशी खालील माध्यमाद्वारे जोडले जाऊ शकता.
What's App ------------»   Join करा.
Facebook ---------------»  Join करा.
Telegram -----------------»  Join करा.


Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم