या शेतकरी पठ्याने कमालच केली 2 महिन्यात घेतले 30 लाख 80 हजाराचे उत्त्पन्न.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या ब्लॉग वरती. मित्रानो आपला भारत देशाची ओळख दोन प्रकारे होते हे आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे सोने की चिडियाँ आणि दुसरे म्हणजे कृषिप्रधान देश. परंतु आजही या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.the farmer शेतकऱ्यांचा धीर सुटू नये त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आजची ही पोस्ट.
जसे की या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरु झाल्याने the farmer शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन यासारख्या पारंपरिक पिकांची पेरणी केली होती. परंतु या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही.उगवले तर त्याला शेंगा नाही, काही शेतकऱ्यांनी बटाटे लावले तर त्याला फक्त पाला आला बटाटे एक पण नाही. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. यातील अनेकांनी सोयाबीनची पुन्हा पेरणी न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली. ज्या शेतकऱ्यांनी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोथिंबीर उत्पादन घेतले होते त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांनी यामधून लाखो रुपयांचा फायदा मिळवला आहे. हे आपण ऐकले आणि पाहिले देखील.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर त्याचबरोबर पिकाला योग्य भाव व कमी उत्पादन खर्च यामुळे कोथिंबीर पिकातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी आपल्या शेतात घरीच तयार झालेले गावरान शेणखत वापरून त्या जमिनीवर जुलै महिन्याच्या मध्यंतरी कोथिंबीर पिकाच्या घरगुती बियाणांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी त्यांनी केली.ही एक अचंबित करणारी गोष्ट आहे जिथे महागडे बियाणे शेतकऱ्याला दगा देतात तिथेच या शेतकऱ्याने घरगुती बियाण्यांचा वापर करून अचंबित करणारे उत्पन्न घेतले. घरगुती बियाणे असल्याने त्यांना त्याचा अधिक फायदा झाला. दहा दिवसांत पिकाची उगवण झाली, २० व्या दिवशी त्यांनी खुरपणी केली. ज्यामुळे पिकाची योग्य वाढ झाली. तसेच पिकाला रोगापासून वाचवण्यासाठी त्यांनी एकूण ४ फवारण्या केल्या. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी आणि योग्य रंग येण्यासाठी झाला.यातून शेताची काळजी आणि नियोजनाची ओळख होते.
पाटील यांनी गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.त्याचबरोबर शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची त्यांच्या या आवडीने आज त्यांना हे भरघोस उत्पन्न मिळवले आहे. ते नियमित रोज पहाटे पाच वाजता शेतात जाऊन ते पूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन करतात. राजकीय जीवनाबरोबरच त्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याची कला त्यांच्या अंगात आहे. हेच त्यांच्या या प्रगतीची चावी आहे.
mtechmarathi.in सर्व शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, जगाच्या पोशिंद्याला मनाचा मुजरा करत आहे.
إرسال تعليق
thank you for your feedback