आपल्या फोटोचा Background काही सेकंदात Remove करा. अगदी मोफत

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेबसाईट वर आमंत्रित करतो, कारण इथे आपणाला आपल्या अभ्यासात भर टाकण्यासाठी  प्रश्नसंच, चालू घडामोडी, नौकरी जाहिराती अशी अनेक माहिती पुरवत असतो. आपण पण आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शामिल करा.

  
आपल्या फोटोचा Background काही सेकंदात Remove करा. अगदी मोफत

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi. In या साईट वरती. मित्रानो आपल्याला फोटो काढण्याचा छंद नक्कीच असेल आणि आपण आपला फोटो छान यावा म्हणून सर्वंतरी प्रयत्न करतो. महागडा मोबाईल, महागडे कॅमेरे यांचा आपण वापर करून फोटो क्लीक करतो आणि इतका प्रयत्न करून देखील कधी कधी आपल्या फोटोचा बॅकग्राऊण्ड आपल्या फोटोची शोभा घालवत असतो. पण मित्रानो आता या गोष्टीची तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही आज आम्ही आपल्यासाठी अशी एक ट्रिक आणली आहे जीचा वापर करून आपण आपल्या फोटोचा नको असलेला बॅकग्राऊंड काही सेकंदात काढू शकतो ते ही अगदी मोफत. तर चला जाणून घेऊया आजची ट्रिक.

मित्रानो आपल्या फोटोचा बॅकग्राउंड आपण सहजासहजी काढू शकत नाही. यासाठी आपल्याला महागड्या सॉफ्टवेअर ची गरज पडते. आणि असे सॉफ्टवेअर आपल्याकडे उपलब्ध नसतात किंवा ते सॉफ्टवेअर विकत घेणे शक्य नसते. पण एक पर्याय आहे ज्याने आपण आपला फोटोचा नको असलेला बॅकग्राऊंड काही सेकंदात Remove करू शकतो.

मित्रानो यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही सोपा मार्ग आहे.
आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणतेही एक browser open करा. तुम्ही यासाठी कोणतेही browser चा वापर करू शकता.

Browser open केल्यावर सर्च बार मध्ये एक वेबसाईट टाका Remove.bg साईट url टाकल्यानंतर सर्च करा.
Google list मध्ये सर्वात पहिली जी वेबसाईट दिसेल जी Remove.bg नावाने दिसेल तिच्यावर क्लीक करून त्या साईट ला उघडा.

उघडल्यानंतर तुमच्या समोर एक पेज open होईल ज्यामध्ये तुम्हाला Upload Image असा पर्याय दिसेल, त्या upload image पर्यावर क्लीक करा.

Upload Image पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो निवडण्यासाठी सांगितले जातील. आता तुम्हाला ज्या फोटोचा बॅकग्राऊंड काढून टाकायचा आहे. तो फोटो निवडा आणि पूर्ण (Done) करा.

यानंतर तुम्ही निवडलेला फोटो ही साईट आपोआप तपासून तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड अगदी छान असा काढून टाकेल. कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काम करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. काही सेकंद प्रतीक्षा केल्यानंतर तुमचा बॅकग्राऊंड नसलेला फोटो तुमच्या समोर open होईल. आता त्या फोटो ला तुम्ही डाउनलोड करा.

तुम्ही पाहाल कि कोणत्याही प्रकारच्या कामाशिवाय आणि त्रासाविना आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड निघून गेला असेल.

मित्रानो जर आपल्याला ही post वाचून देखील काही अडचण येत असेल तर तुम्ही खालील video पाहू शकता.






आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم