कोविड सेंटर मध्ये बाळाला जीवे मारण्याची धमकी देऊन 20 वर्षीय आईवर बलात्कार.
पूर्ण देशभरात आणि राज्यात कोरोनाने मोठे थैमान घातले आहे. यामुळेच कोरोना बाधितांसाठी ठीकठिकाणी कोविड सेंटर देखील उघडण्यात आले आहे. आणि याच बरोबर अश्या अनेक ठिकाणी काही घटना घडल्याचे देखील ऐकू आले आहे.
ठाण्यातील एका कोविड सेंटर मध्ये सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे येथील एका कोविड सेंटर मध्ये ही घटना घडल्याचे समजत आहे. या ठाण्यातील कोविड सेंटर मध्ये एका 27 वर्षीय तरुणाने एका 20 वर्षीय तरुणीवर जबरदस्ती बलात्कार केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी कि ठाणे येथील मीरा रोड परिसरामध्ये हे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. याच सेंटर मध्ये या तरुणीला आपल्या 10 महिन्याच्या बाळासोबत क्वारंटाईन केले गेले होते. सोबतच्या सेंटर मध्ये आपल्या नातलग याला भेटण्यासाठी ही तरुणी गेली असता तिच्या वर आरोपीने बलात्कार केल्याचे समजत आहे.
सदर 27 वर्षीय आरोपी गरम पाणी देण्याच्या कारणाने या तरुणीच्या खोलीत येत होता. काही दिवसानंतर या आरोपी नराधमाने बाळाला जीवे मारून टाकील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या 27 वर्षीय आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या तरुणीवर तीन वेळा बलात्कार केल्याचे समजत आहे. आपल्या परिवाराची बदनामी नको म्हणून या तरुणीने त्या वेळी कोणतीही तक्रार केली नव्हती. परंतु या गोष्टीचा उद्रेक झाल्यामुळे या पीडितेने नवघर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली आहे. याच तक्रारीवरून सदर घटनेचा आरोपी याला अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback