मोफत गॅस कनेक्शन मिळवण्याची अखेरची संधी, अंतिम 7 दिवस आहेत बाकी असा करा अर्ज.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

गॅस कनेक्शन मोफत मिळवण्याची अखेरची संधी, अंतिम 7 दिवस आहेत बाकी असा करा अर्ज.




प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत कोणालाही गॅस कनेक्शन अगदी मोफत मिळू शकते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर असून या योजनेच्या तारखेमध्ये एप्रिल ते सप्टेंबर अशी वाढ़ करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना विनामूल्य गॅस सिलेंडर मिळावे हा होता.


नोंदणीची प्रक्रिया


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत आपल्याला देखील नोंदणी करायची आहे का? या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करणे अगदी सोपे झाले आहे. BPL कुटुंबातील महिला या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकते. या साठी आपल्याला या योजनेसाठीच्या तयार केलेल्या अधिकृत साईट www.pmujjwalayojana.com वरती जाऊन आपली नोंदणी करावी लागेल.



योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेच्या लाभासाठी आपल्याकडे सादर कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. BPL कार्ड
  2. आधार कार्ड
  3. मोबाईल नंबर
  4. पासपोर्ट साईज  चे 2 फोटो
  5. वयाचे प्रमाणपत्र
  6. BPL यादीमधील नाव मुद्रण
  7. बँक पासबुक झेरॉक्स
  8. रेशनकार्ड झेरॉक्स


योजनेच्या लाभासाठी अशी करा नोंदणी.


  • सर्वप्रथम अर्जदाराने या योजनेच्या अधिकृत संकेत स्थळावर जावे.
  • मुखपृष्ठ उघडल्यानंतर डाउनलोड फॉर्म वरती क्लीक करा.
  • यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फॉर्म वरती क्लीक करा.
  • आपला फॉर्म आता डाउनलोड करून घ्या.
  • फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर फॉर्म मधील सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर हा फॉर्म आपल्या जवळील LPG केंद्रावर जमा करा.
  • सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे देखील जमा करा.
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आपल्याला गॅस कनेक्शन मिळेल.

उज्ज्वला योजनेच्या लाभासाठीच्या अटी.


  1. अर्ज करणारी व्यक्ती हि महिला असणे आवश्यक आहे.
  2. सदर महिलेचे वय वय वर्ष 18 पूर्ण असावे.
  3. सदर महिला BPL कुटुंबातील असावी.
  4. सदर महिलेकडे BPL  कार्ड आणि BPL रेशनकार्ड असावे.
  5. सदर महिलेचे किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे LPG कनेक्शन नसावे.

आपण वरील सर्व अटींची पूर्तता करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकता. याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर असून त्या अगोदर आपले अर्ज जमा करणे गरजेचे आहे.


सदर POST आपल्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा. एखाद्या कुटुंबाची नक्की मदत होऊ शकते.

आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم