पोलीस निरीक्षकानेच केला बलात्कार ; थंड पेयामध्ये मिळवले होते गुंगीचे औषध.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

पोलीस निरीक्षकानेच केला बलात्कार ; थंड पेयामध्ये मिळवले होते गुंगीचे औषध.




खोली दाखवण्यासाठी नेऊन थंड पेयामध्ये भुलीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत भगवानराव माने सध्या नेमणूक सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र अशी या अधिकाऱ्याची ओळख आहे.


एका पन्नास वर्षीय महिलेने हि तक्रार समर्थ पोलिसांकडे दिली असून. हा प्रकार जवळपास सन 2009 पासून सुरु असल्याचे समजत आहे. सदर अधिकारी चंद्रकांत माने हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत असताना त्यांची या सदर तक्रारदार महिलेबरोबर ओळख झाली होती. एक घर दाखवण्याच्या बहाण्याने माने याने या महिलेला नेले. त्या ठिकाणी थंड पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिला गुंगी  आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.सोबतच या प्रकारचा व्हिडिओ आणि छायाचित्र देखील काढले.


सदर घटना समजल्यावर चंद्रकांत माने याने सदर महिलेला हे व्हिडिओ आणि छायाचित्र दाखवून हे सर्व मी तुझ्या नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करण्याची धमकी देखील दिली. तुझ्या सोबत लवकरच लग्न करेन असे बोलून त्याने तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. या नंतर लग्नाबद्दल विचारणा केली असता माने याने टाळाटाळ केली असे देखील महिलेने तक्रारीमध्ये म्हंटले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी माने याने सदर फोटो आणि व्हिडिओ सदर महिलेच्या व्हाट्सअँप वरती पाठवून, लोकडाऊनमध्ये देखील त्याने तिच्यावर अत्याचार केले असे देखील तक्रारीमध्ये सदर महिलेने नमूद केले आहे.


महिलेच्या फिर्यादीनुसार चंद्रकांत माने यांच्यावर गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाबाबत अधिक पुरावे समर्थ पोलीस शोधात आहेत.  







आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم