जर तुम्ही पण एटीएम चा वापर करत असाल तर हे नक्की वाचा.
अलीकडेच मध्यप्रदेश ची राजधानी भोपाळमध्ये एटीएम मधून लोकांचे काढ क्लोन करून पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या एटीएम कार्ड मधून जवळपास 35 लाख रुपये चोरी केले गेले. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात होत असणारा बदल आपल्याला काही गोष्टीची जाणीव करून देत आहे. याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांची लूट होत आहे.
एटीएम सेवा सुरू झाल्यापासून काही लोकांनी अशा काही डिवाइस बनवल्या आहे ज्याद्वारे कोणत्याही काढला क्लोन म्हणजेच डुबलीकेट बनवून माहिती चोरली जाते. मध्य प्रदेश च्या भोपाळ मध्ये झालेली घटना या गोष्टीची जाणीव करून देते. तुमचे एटीएम कार्ड पूर्णपणे सुरक्षित नाहीत. काही हॅकर्स एटीएम मशीन मध्ये अशा काही डिवाइस बसवतात ज्यांची तुम्हाला जाणीव देखील नसते. आणि जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड चा वापर करतात त्यावेळेस तुमची पूर्ण माहिती हायकर्स पर्यंत पोचली जाते.
अशा धोकाधडी पासून वाचण्यासाठी एटीएम चा वापर करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊया.
सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला अशा एटीएम'मध्ये अजिबात जायचे नाही जे अत्यंत एकांतात किंवा सुनसान जागेत आहे. आपण गरजेच्या ठिकाणच्या एटीएम चा वापर करू शकता. कारण अशा ठिकाणी अशा डिवाइस बसवण्याच्या घटना जास्त दिसून येतात. परंतु गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या एटीएम मध्ये असे डिवाइस बसवणे शक्य नसते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी एटीएमचा वापर जास्तीत जास्त करा.
एटीएम कार्ड एटीएम स्लॉटमध्ये टाकण्याअगोदर एटीएम चे स्लॉट व्यवस्थित तपासून घ्या.
एटीएम चा पिन टाकण्या वेळी तो पिन कुणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या. अगदी एटीएम कार्ड मध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील आपला पिन दिसायला नको.
जर आपण पहिल्यांदाच एटीएम कार्डचा वापर करत असाल. तर अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. आपल्या ओळखीच्या कोणत्याही एका व्यक्तीची मदत घ्या.
जर एटीएम मध्ये रक्कम टाकून देखील तुमचे पैसे जर आले नाही तर त्याच वेळी बँक किंवा एटीएम प्रबंधक यांच्याशी संपर्क साधा. काही वेळेस पैसे येत नाहीत म्हणून लोक निश्चित होऊन बाहेर पडतात. कारण अशा वेळी एटीएम मध्ये पहिल्यांदी छेडखानी केलेली असेल. छेडखानी करणारी व्यक्ती तुमचे पैसे काढून घेते. त्यामुळे थोडासा वेळ थांबून खात्री करून घ्या अन्यथा बँकेशी संपर्क साधा.
काही लोक एटीएम चा पिन नंबर विसरू नये म्हणून आपला पिन कोड एटीएम कार्ड च्या पॉकेट वरती किंवा एटीएम वरती लिहून ठेवतात. ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत धोकेदायक ठरू शकते. असे अजिबात करू नका. वाटल्यास तुम्हाला सोपा वाटेल असा एखादा पिन कोड सेट करून घ्या.
إرسال تعليق
thank you for your feedback