संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
वेळेत व्हा सावध अन्यथा.... ! कपल चॅलेंज बद्दल सायबर पोलिसांनी दिला इशारा.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक वरती चर्चेत असणारे कपल चॅलेंज मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे. सध्या फेसबुक वर कपल चॅलेंज ठेवण्यात आले असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कारण तुम्ही पाठवलेल्या फोटो चा गैरवापर होऊ शकतो त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागू शकतो असे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे.
कोरोना च्या काळात लोकांकडून फेसबुक, ट्विटर वरती अनेक वेगवेगळी चॅलेंज दिली जात आहेत. अश्यातच फेसबुक वरती एक #CoupleChallenge सध्या फेसबुक सोबत इतर सोसिअल साईट वरती मोठ्या प्रमाणात viral होत आहे. या मध्ये पती - पत्नीचे सोबतचे फोटो टाकण्याचे आवाहन केले आहे. या गोष्टीला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. आणि लोक मोठ्या प्रमाणात आपले जोडीचे फोटो फेसबुक वरती शेअर करत आहेत. अनेक लोक आपल्या भेटीपासून ते लग्नापर्यंत असणारे फोटो देखील शेअर करत आहेत.
या कपल चॅलेंज वाल्या व्यक्तींना सायबर पोलीस क्रिमिनल चॅलेंज ना करो म्हणजे झाले,!नाही तर ता कपल चॅलेंज चे खपल चॅलेंज होण्यास वेळ लागणार नाही. असा इशारा पुणे सायबर पोलिसांनी दिला आहे. सोशियल साईट वरती टाकलेल्या फोटोंचा अनेकदा गैरवापर केला जातो. असे टाकलेलं फोटो मार्फिग करून पॉर्न साईट वरती अपलोड केले जातात. बहुदा बदला घेण्याच्या सूडबुद्धीने असे केल्याचे दिसून येते. असे फोटो विचित्र माणसांच्या हाती लागले तर परिवारामध्ये चारित्र्यावर संशय घेतला जाऊ शकतो. यामुळे एखादी मोठी घटना होण्याचे नाकारता येत नाही. या मुळे या चॅलेंज मध्ये फोटो टाकताना एक वेळ विचार नक्की करा असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback