संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
आणखी एका निर्भयाचा बळी, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू, चार जणांनी केला होता बलात्कार.
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कारातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदर पीडित मुलीवर 14 सप्टेंबर रोजी स्वतःच्या शेतामध्ये चार व्यक्तींनी ती शेतात जात असताना तिच्यावर बलात्कार केला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सदर पीडितेला अलिगढ येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. परंतु पीडितेची परिस्थिती गंभीर असल्याचे लक्ष्यात आल्यावर उच्च वैद्यकीय उपचाराकरिता तिला दिल्ली येथील सफदरजंग दवाखान्यात हलवण्यात आले होते.
सविस्तर माहिती अशी की सदर पीडित मुलगी आपल्या आईसोबत आपल्या शेतात गेली होती. काही वेळानंतर ती अचानक तेथे दिसेनासी झाली. त्या नंतर काही वेळाने ती अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आली. सदर आरोपीनी तिचा गळा दाबून तिला मारून टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता. पोलिसांनी या चारही आरोपीना अटक केली आहे. हातरस येथील प्रभारी कोतवाली यांनी त्या आरोपीना पोलीस लाईन मध्ये पाठवले होते. याचबरोबर महिलेच्या घरी देखील पोलीस तैनात केले गेले होते.
सदर घटना ही निर्भया घटनेची आठवण करून देणारी घटना आहे. सदर पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत गंभीर होती अश्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी पहाटे जाहीर केली होती.
याबद्दल (बसपा ) अध्यक्ष्या मायावती यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवला होता. उत्तरप्रदेश मध्ये कोणत्याही समाजाची महिला सुरक्षित नाही असे देखील मायावती यांनी म्हंटले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष्य देण्याचे देखील त्या बोलल्या होत्या.
إرسال تعليق
thank you for your feedback