शुक्र ग्रहावर राहते कुणीतरी? फॉस्कीन वायू सापडल्याने चर्चेला उधाण.
आपण या ब्रम्भाण्डमध्ये एकटेच राहत नाही या बाबत अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या किव्हा ऐकल्या असतील, जसे कि एलियन च्या गोष्टी आणि याला दुजोरा देणारे पुरावे देखील आहेत. पृथ्वीवर जसे प्राणिजीवन आहे तसेच काहीसे चंद्रावर किंवा इतर ग्रहांवर एलियन म्हणजेच परग्रही राहत आहे असे पुरावे देखील मिळून आले आहेत. परंतु शुक्र ग्रहावर देखील कोणीतरी राहत आहे अशी चर्चा आता सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे शुक्र ग्रहावर आढळून आलेला फॉस्फिन वायू आहे.
शुक्र ग्रहाच्या भोवती फॉस्फिन वायू आढळून आल्याने शुक्र ग्रहावर जीवसृष्टी असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.असा विश्वास आंतरराष्ट्रीय खगोलशात्राज्ञांच्या एका ग्रुप ने केला आहे. या दाव्यामुळे परग्रहावर जीवसृष्टी आहे या मानवी कुतूहल असणाऱ्या विषयाला आता उधाण आले आहे. परंतु तप्त आणि रसायनयुक्त असणाऱ्या शुक्र ग्रहावर कोणते सजीव जिवंत राहू शकतात हा विचार करणारा प्रश्न देखील समोर आहे. म्हणून हा फॉस्फिन वायू शुक्र ग्रहावर कश्याप्रकारे आला याचा अभ्यास करायला हवा असे खगोलशात्रज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय जर्नल 'नेचर ' या मध्ये शुक्र ग्रहावर फॉस्फिन वायू आढळून आल्याचे अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. या बरोबरच शुक्र ग्रहावर असणाऱ्या सूक्ष्म जीवजंतूंनीच फॉस्फिन वायू वातावरणामध्ये सोडला असावा असे आंतरराष्ट्रीय खगोलशात्राज्ञांनी केला आहे. शुक्र ग्रहावरून तब्बल 50 हजार मीटर म्हणजे जवळपास 31 मैल अंतरावरील वातावरणामध्ये फॉस्फिन वायू मिळून आला आहे. हा वायू शुक्र ग्रहावर कसा मिळून आला या बद्दल तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मत निर्माण होत आहे.
إرسال تعليق
thank you for your feedback