संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
झोपेत घोरण्याची असेल सवय तर सावधान ! कोरोनामुळे तीनपट अधिक आहे मृत्यू चा धोका.
झोपेत घोरण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचा धोका तीनपट असतो, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ वावरीकच्या वैज्ञानिकांनी ऑब्स्टक्टिव्ह स्लिप अँपनिया आणि कोरोना विषाणू संदभातील 18 अध्ययनाचा अभ्यास केल्यानंतर केला आहे. त्यांच्या या अभ्यासातून असे दिसून आले कि रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या झोपेत असताना घोरणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा तीनपट अधिक धोका असतो.
झोपेत असणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील स्नायू आराम करत असल्याने त्यांचा श्वसन मार्ग काही काळ बंद होतो. याच कारणामुळे व्यक्ती घोरत असतो. कोरोना बाधित रुग्णांना या विषाणूचा अधिक धोका असतो.
या अभ्यासाच्या माहिती नुसार डायबेटिज, लठ्ठपणा आणि उच्च रक्त दाब असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूमुळे मृत्यूचा धोका अधिक असतो. इंग्लंड मधील 15 लाख व्यक्तींना ऑब्स्टक्टिव्ह स्लिप अँपनिया चा त्रास आहे. यामधील 85% व्यक्ती डायग्रोज झालेले नाहीत. अमेरिकेमध्ये तर तब्बल 2 कोटी 25 लाख व्यक्तींना हा आजार जडलेला आहे.
वैज्ञानिकांनी म्हंटले आहे कि कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीवरील ऑब्स्टक्टिव्ह स्लिप अँपनिया चा प्रभाव जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन करणे गरजेचे आहे. ऑब्स्टक्टिव्ह स्लिप अँपनिया चा संबंध लठ्ठपणासारख्या सर्वच आजारांशी असतो. ज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णाच्या जीवाला अधिक धोका असतो. यामुळे ऑब्स्टक्टिव्ह स्लिप अँपनिया चा त्रास असणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अश्या व्यक्तींनी योग्य उपचार घेऊन जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.
अश्या व्यक्तींनी मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे या नियमांचे पालन अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबर जर त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली तर त्यांनी लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्यावी.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback