काय आहे Telegram? , कसे आपण telegram मधून पैसे कमाऊ शकतो?

काय आहे Telegram? , कसे आपण telegram मधून पैसे कमाऊ शकतो?





नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहे mtechmarathi. In या साईट वर मित्रानो आपण आपल्या मित्र परिवाराला संदेश पाठवण्यासाठी अगोदर फक्त टेक्स्ट संदेश चा वापर करत होतो, कालांतराने टेकनॉलॉजि जशी विकसित झाली तसें आपल्याला समोर भरपूर पर्याय निर्माण झाले जसे कि फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप, टेलिग्राम, etc. आणि आपण देखील या टेकनॉलॉजि चा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु आपण याचा फक्त संदेश पाठवणे किंवा मित्र परिवाराशी जोडून राहण्यासाठी वापर केला आणि आजही करत आहोत, पण आपल्याला हे माहिती नसावे कि काही लोक याचा पैसे कमावण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापर करून चांगले पैसे कमावत आहेत, आता या तुमचा विश्वास बसणार नाही पण हे एकदम खरे आहे, आपण आज अश्याच एका अँप बद्दल जाणून घेणार आहोत, आणि ते अँप आहे टेलिग्राम.

मित्रानो हे मला आणि जवळपास सोसिअल मीडियाचा वापर करणाऱ्या 85% लोकांना माहिती आहे कि संदेश पाठवण्यासाठी पूर्ण जगात व्हाट्सअँप चा सर्वात जास्त वापर करतात परंतु टेलिग्राम देखील या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वापरत आणले जाते, या मध्ये अगोदर आपण फक्त संदेश पाठवणे हा एकच पर्याय वापरू शकत होतो परंतु टेलिग्राम ने आपल्या या अँप मध्ये खूप काही बदल केले आहे. यात तुम्ही आता स्वतःचा ग्रुप तयार करू शकता जसे आपण व्हाट्सअँप मध्ये करतो. त्याच बरोबर तुम्ही टेलिग्राम मध्ये स्वतःचा चॅनेल देखील तयार करू शकता. अश्या अनेक पर्यायाने टेलिग्राम पूर्ण दुनियेत धुमाकूळ घालत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आता हे अँप इतर अँप ला टक्कर देत आहे.

या अँप चा वापर करून कित्तेक लोक हजारो नाही तर लाखो रुपये घरी बसून कमावत आहे कसे ते आपण आज या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला टेलिग्राम अँप मध्ये चॅनेल किंवा ग्रुप तयार करावा लागेल. तर चला जाणून घेऊन पूर्ण स्टेप बाय स्टेप


  • Telegram अँप काय आहे :-

Telegram हे व्हाट्सअँप, फेसबुक म्यॅसेंजर  सारखेच एक प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर तुम्ही संदेश पाठवणे, विडिओ कॅल्लिंग करणे या साठी करू शकता. इतर अँप्स प्रमाणे हे अँप देखील मोठ्या प्रमाणावर लोक वापरतात.


  • Telegram अँप मध्ये ग्रुप कसा तयार करावा:-


Telegram मध्ये ग्रुप तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला telegram हे अँप डाउनलोड करावे लागेल, telegram अँप कोठून डाउनलोड करायचे या साठी खालील स्टेप पहा.
आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या google  play store मध्ये जा  सर्वात वरती सर्च बार मध्ये telegram असे लिहा आणि सर्च करा.
सर्वात पहिले जे अँप तुमच्या समोर open होईल ते अँप डाउनलोड करा.
अँप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा. अँप open झाल्यानंतर तुमच्या डाव्या हाताला असणाऱ्या तीन line वरती क्लीक करा. त्या नंतर तुम्हाला Create Group  हा पर्याय दिसेल त्या वर क्लीक करा.
त्या नंतर आपल्याला आपल्या group चे नाव द्यावयाचे आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकता. त्या नंतर तुमच्या मित्र - परिवाराला त्या मध्ये add करा. आणि Create या पर्यायावर क्लीक करा. हा तुमचा टेलिग्राम ग्रुप तयार झाला.


  • Telegram चॅनेल कसा तयार करावा :-


Telegram मध्ये चॅनेल  तयार करण्यासाठी सर्वप्रथम अँप ओपन करा. अँप open झाल्यानंतर तुमच्या डाव्या हाताला असणाऱ्या तीन line वरती क्लीक करा. त्या नंतर तुम्हाला Create New Channel   हा पर्याय दिसेल त्या वर क्लीक करा.
त्या नंतर आपल्याला आपल्या Channel चे नाव द्यावयाचे आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकता. त्या नंतर तुमच्या मित्र - परिवाराला त्या मध्ये add करा. आणि Create Channel या पर्यायावर क्लीक करा. हा तुमचा टेलिग्राम Channel तयार झाला.


  • Telegram अँप मधून पैसे कसे कमवायचे :-


मित्रानो वरती आपण ज्या ग्रुप आणि चॅनेल च्या प्रॉसेस केल्या त्या पैसे कमावण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, म्हणजे आपण जो ग्रुप आणि चॅनेल तयार केला आहे त्यावर काम करून आपण पैसे कमाऊ शकतात. तुम्हाला ग्रुप किंवा चॅनेल मध्ये लोकांना add करायचे आहे, आता पैसे कमावण्याचे मार्ग काय आहे ते जाणून घेऊ.

1) URL शॉर्टनर साईट :-

मित्रानो telegram मधून पैसे कमावण्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे url शॉर्टनर साईट. यात तुम्हाला जास्त काही करण्याची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पोस्ट अथवा विडिओ ची लिंक घेऊन url शॉर्टनर साईट वरतून तिला छोटे करून आपल्याला ग्रुप किंवा चॅनेल वर पेस्ट करायचे आहे. जेव्हा कोणी त्या लिंक वर क्लीक करेल तेव्हा तेव्हा तुमची इनकम चालू झाली असे समजा. आता Url शॉर्टनर साईट कोणती वापरायची या बदल सांगू इच्छितो कि तुम्हाला इंटरनेट वरती अश्या भरपूर साईट्स मिळून जातील.

2) Affiliate मार्केट :-

Affiliate मार्केट म्हणजे असे प्लॅटफॉर्म आहे ज्यातून तुम्हाला फक्त कोणत्याही वस्तूची जाहिरात करावी लागते, जसे मोबाईल, लॅपटॉप, कपडे, शूज  या साठी तुम्हाला affiliate अकाउंट तयार करावे लागेल त्या साठी तुम्ही कॉमेंट करू शकता, amazon, flipkart, अश्या साईट चा वापर करू शकता. त्या प्रॉडक्ट ची लिंक आपल्याला आपल्या ग्रुप आणि चॅनेल वर share करावी लागते. जेव्हा कोणी त्या लिंक वरती क्लीक करून ती वस्तू खरेदी करेल त्या वेळी तुम्हांला त्या वस्तूच्या ठराविक टक्के रक्कम ती कंपनी देत असते. पैसे कमावण्याचा हा पर्याय देखील प्रसिद्ध आहे.

3) Paid जाहिरात :-

तुमच्या telegram ग्रुप किंवा चॅनेल वर जर चांगल्या प्रकारे ट्रॅफिक म्हणजेच जास्त लोक असतील तर तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता. चांगल्या प्रमाणात लोक असतील तर कुठल्याही गोष्टीचे तुम्ही paid प्रमोशन करून पैसे कमाऊ शकता. आपल्याला जवळपास असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलू शकता कि माझ्या चॅनेल वरती इतके इतके लोक आहे मी तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या ग्रुप अथवा चॅनेल वरती करतो त्या बदल्यात मला महिना किंवा onetime इतके पैसे द्या.

तर मित्रानो असे अनेक पर्यायाचा वापर करून तुम्ही telegram अँप चा पैसे कमावण्यासाठी वापर करू शकता. पैसे कमावण्याचे इतर कोणते मार्ग आहेत यासाठी कंमेंट नक्की करा.

Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने