आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच होणार 12000 पदाची भरती
नुकतेच इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असून बारावी उत्तीर्ण व नौकरीच्या शोधात असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात रिकाम्या असलेल्या केवळ 10 हजार जागाच नाही तर तब्बल 12 हजार 538 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून. ही रिकामी पदे डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण भरावी, असे आदेश राज्याचे गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्या मुळे राज्यात लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात होण्याचे संकेत दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांनी अलीकडेच गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात मंत्रालयात एक महत्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत महाराष्ट्र पोलीस दलात रिकाम्या पदांची तब्बल 12 हजार 538 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच चालू करून ही भरती प्रक्रिया 2020 या वर्ष्याच्या शेवटच्या म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावी असे आदेश राज्याचे गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहे. या बैठकी दरम्यान महाराष्ट्र राजाच्या गृहविभागाचे मुख्य सचिव मा. सीताराम कुंटे साहेब, अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र राज्याचे अर्थ विभागाचे वरिष्ठ सचिव मा. नितीन गद्रे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक मा. सुबोध जयस्वाल आणि विशेष प्रधान सचिव मा. अमिताभ गुप्ता हे सर्व अधिकारी उपस्तित होते.
राज्याच्या पोलीस प्रशासनावर आलेला भार लक्ष्यात घेऊन मा. अनिल देशमुख यांनी हा निर्णय अतिशय जलद गतीने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार आणि नौकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरणार आहे. लवकरच महाराष्ट्र पोलीस दलात नवीन चेहरे दिसणार असून उमेदवारांनी आपली तयारी कायम ठेऊन या भरती मध्ये उतरावे असे आवाहन mtechmarathi.in समूह आपल्याला करत आहे.
भरतीची जाहिरात आणि भरती संदर्भातील माहिती जलद गतीने मिळवण्यासाठी आम्हाला follow नक्की करा.
प्रश्नपत्रिका आणि भर्तीबाबत अधिक माहितीसाठी comment नक्की करा .
ईमेलद्वारे Follow करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback