चित्रपट फक्त 17 मिनिटाचा परंतु शिक्षणाची जाणीव जरून देणारा. नक्की पहा.
नमस्कार मित्रानी स्वागत आहे आपले mtechmarathi.in या ब्लॉग वरती. मित्रानो शिक्षण किती महत्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे परंतु प्रत्यक्षात या गोष्टीचा विचार केला तर अजूनही किती तरी मुळे शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही म्हणून. हाताला मिळेल ते काम करताना आपण अनेक मुलांना पाहतो. आणि साहजिकच बोलून जातो कि काय यांचे आई वडील जे यांना शिकवायचे सोडून काम करायला लावतात. परंतु ते का असे काम करतात याची जाणीव आपल्याला नसल्यामुळे आपण असे बोलून जातो.
शिक्षणाचा अधिकार सर्वाना आहे असे बोलणे जितके सोपे वाटते तितके सोपे नाही. शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही म्हणून अनेक मुळे वेगळ्या वळणावरती गेलेले आपण पाहिले आहे. परंतु आज एका 17 मिनिटाच्या या पिस्तुल्या या चित्रपटाद्वारे आपल्याला याची प्रचिती नक्की होईल. Mtechmarathi आपल्याला विनंती करते कि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया एक सुज्ञ नागरिक म्हणून नक्की नोंदवाव्या. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आणि समाजासाठी महत्वाच्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback