राफेल चे नाव ऐकून का घाबरतात इतर देश, पहा राफेल ची वैशिष्ट्ये

राफेल चे नाव ऐकून का घाबरतात इतर देश, पहा राफेल ची वैशिष्ट्ये

चीन सोबत वारंवार होत असलेल्या वादामध्येच हिंदुस्तानच्या ताकतीत किती तरी जास्त ताकद निर्माण करणारे राफेल हे लडाकु विमान नुकतेच हिंदुस्थान मध्ये दाखल झाले. या मुळे हिंदुस्तानसोबत वारंवार टक्कर घेऊ इच्छिणाऱ्या देशांच्या मनात मात्र मोठी भीती निर्माण झाली आहे.
 राफेल हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वात भयंकर लडाकु विमान असून हे दुनियेतील ठराविक देशांकडेच आहे त्यात हिंदुस्तानची भार पडली आहे.आज आपण जाणून घेऊया कि का दुश्मन घाबरतात राफेल चे नाव ऐकले तरी.
राफेल


या विमानाची भारताला तब्बल 22 वर्ष वाट पाहावी लागली आहे. यावरून खूप वाद झाल्याचे देखील आपणाला माहिती आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि या अगोदर सन. 1997 मध्ये भारताला रुस ने सुखोई हे लडाकु विमान दिले होते.

या दोघांना मिळाला राफेल आणण्याचा मान:-

फ्रांस मध्ये खरेदी केलेल्या एकूण 36 राफेल लडाकु विमानांपैकी पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. यातच उत्तर प्रदेशच्या दोन पायलट ना हा मान मिळाला असल्याने उत्तर प्रदेश ची मान उंचावली आहे. विंगकमाण्डर मनीष सिहं आणि विगकमाण्डर अभिषेक त्रिपाठी असे या जवानांचे नाव आहे.



राफेल मधील मिटीऑर क्षेपणास्त्र ची वैशिष्ट्ये:-

  • मिटीऑर एयर टू  एयर  म्हणजेच हवेतून हवेत मारा करणारे सर्वोत्तम क्षेपणास्त्र आहे.

  • बियाँड व्हिजुअल रेंज म्हणजे नजरेच्या पलीकडे असणाऱ्या लक्ष्याचा हे अचूक वेध घेते

  • मिटीऑर 120 ते 150 किलोमीटर अंतरापर्यंत दुश्मनांचे फायटर विमान पाडू शकते

  • चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे असे आधुनिक विमान आणि क्षेपणास्त्र नाही.

  • क्षेपणास्त्र डागल्या नंतर त्याचा नियोजित मार्ग देखील बदलता येतो.

  • राफेल मध्ये असलेल्या स्केल्प मिसाईल ची मारक क्षमता 300 किलोमीटर आहे.

  • राफेलची सर्वात जास्त गती ही तासी  2130 किलोमीटर  ते  तासी 3700 किलोमीटर इतकी आहे\



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने