प्रधान मंत्री आवास योजना - घर विकत घेण्यासाठी हवी असेल सबसिडी तर या अटींचे करावे लागेल पालन
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपले स्वतःचे एक घर असावे. परंतु काही आर्थिक बाबींमुळे आपले स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु प्रधान मंत्री आवास योजने द्वारे आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. या योजने मध्ये स्वतःचे घर घेण्यासाठी तुम्हाला काही आर्थिक मदत मिळत असते. ज्यामध्ये तुम्हाला कर्जावर सबसिडी सूट मिळते. आणि या द्वारे दिली जाणारी रक्कम ही सरळ तुमच्या बँक खात्यात वर्ज केली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेनुसार मिळणारी क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेची मुदत वाढून ती आता 31 मार्च 2021 केली आहे. जर तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर खालील अटी पूर्ण कराव्या लागतील.
काय आहेत या योजनेचे फायदे :-
या योजनेअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना गृह कर्जावर व्याजावर सबसिडी मिळते. ही रक्कम जवळपास 2 लाख 67 हजार इतकी असते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींना 9 लाखापर्यंत गृहकर्ज घेतल्यास 4% व्याज सबसिडी मिळते.
काय आहेत अटी :-
मित्रानो प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रमाणे काही अटी आहेत त्यातील पहिली अट म्हणजे जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ इच्चीते त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख ते 18 लाख च्या आतमध्ये असावे. दुसरी अट म्हणजे जो लाभार्थी असेल त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये इतर कुणाचे ही पक्के घर नसावे. तिसरी अट म्हणजे तुम्ही जो अर्ज करणार आहात तो अर्ज तुम्हाला परिवारातील महिलेच्या नावाने करावे लागेल सोबतच त्या व्यक्तीचे वय हे 21 वर्ष ते 55 वर्ष यामध्ये असावे.
अर्ज कसा करावा :-
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला जावे लागेल. https://pmaymis.gov.in या साईट वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या मध्ये लॉगिन करावे लागेल. जर अर्जदार LIG, MIG किंवा EWS प्रवर्गातील असेल तर तुम्हाला इतर 3 पर्यायांवर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, आपले पूर्ण नाव टाकावे लागेल. या नंतर open होणाऱ्या पेज वरती तुम्हाला तुमची संपूर्ण वयक्तिक माहिती भरावी लागेल. जसे कि पूर्ण नाव, पत्ता, घरातील व्यक्तींची संपूर्ण माहिती, इतर.. हे झाल्यानंतर तुम्हाला खालील रकान्यातील चौकटीवर क्लीक करावे लागेल. वरील सर्व माहिती खरी आहे याची पूर्तता करण्यासाठी हे महत्वाचे असते. आता खाली एक सांकेतिक शब्द विचारला जाईल तो आहे तसा टाका.आणि आता आपला अर्ज submit बटण वर क्लीक करून जमा करा.
प्रधानमंत्री मंत्री आवास योजनेच्या यादीतील आपले नाव कसे तपासावे :-
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपले नाव यादी मध्ये आहे कि नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत साईट ला भेट द्यावी लागेल. जी पुढील प्रमाणे आहे. https://pmayg.nic.in.
इथे open केल्यावर तुम्हाला मुखपृष्ठावर Stakeholders पर्यायावर क्लीक करावे लागेल. क्लीक केल्यानंतर तुम्हाला IAY/beneficiary या पर्यायावर क्लीक करा. आता तुमच्या पुढे एक नवीन पेज open होईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. जर तुमच्या कडे तुमचा नोंदणी क्रमांक नसेल तर अधिक तपास ( Advance Search) यावर क्लीक करून आपली माहिती भरून तुम्ही आपले नाव तपासू शकता.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback