तुमचा मोबाईल स्लो चालत असेल तर हे करा..! रॉकेट सारखा चालेल तुमचा मोबाईल make fast your moblie-in marathi

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi या मराठी ब्लॉग वरती, मित्रानो तुम्ही ही पोस्ट वाचताय म्हणजे तुम्ही नक्कीच मोबाईल वापरात आहात. आणि आजची ही पोस्ट तुमच्या याच मोबाईलसाठी अत्यंत महत्वाची आहे.
तुमचा मोबाईल स्लो चालत असेल तर हे करा..! रॉकेट सारखा चालेल तुमचा मोबाईल


तुम्ही दिवसभर आपल्या मोबाईल चा वापर करत असतात त्यातच तुमच्या मोबाईल ची रॅम जास्तीत जास्त 2 ते 3 GB असेल आणि दिवसभर मोबाईल चा वापर करत असताना तुमचा मोबाईल गरम होणे, हँग होणे आणि अतिशय कमी गतीने चालणे अश्या बऱ्याच समस्या तुमच्या समोर मोबाईल वापरताना येत असतील, आणि या गोष्टीचा तुम्हाला त्रास देखील होत असेल. पण चिंता करू नका तुमच्या या समस्यांचे समाधान तुम्हाला या पोस्ट मध्ये नक्की मिळेल त्या मुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.


जर तुमचा मोबाईल हळू चालत असेल किंवा हँग करत असेल तर खालील माहिती वाचा ही एक मोबाईलची सेटिंग आहे त्यामुळे अगदी बारकाईने वाचा आणि तसें करा आणि पहा त्या नंतर तुमचा मोबाईल अगदी फास्ट होईल. तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही इतका स्मूथ चालेल तुमचा मोबाईल. तर चला जाणून घेऊ या सेटिंग बद्दल.


सर्वप्रथम तुम्हाला यासाठी आपल्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जायचे आहे.

सेटिंग मध्ये गेल्या नंतर तुम्हाला सर्वात खाली Developer Option असा एक पर्याय दिसेल.


बहुदा ही Developer Option सेटिंग HIDE  म्हणजे लपलेली असते आपल्या मोबाईल मध्ये हे OPTION दिसत नसेल तर तुम्हाला पहिले ते UNHIDE  करावे लागेल. यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.


मोबाईल सेटिंग मध्ये जा

मोबाईल सेटिंग मध्ये सर्वात शेवटी About Phone ही सेटिंग OPTION  दिसेल त्यावरती क्लीक करा.

क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर भरपूर OPTION  खुले होतील, आता त्या मध्ये Bulid Number असे OPTION शोधा. ते OPTION शोधल्यानंतर त्या OPTION वरती 5 ते 6 वेळा एकामागोमाग क्लीक करा. क्लीक करत राहिल्याने तुमचे Developer Option जे लपलेले असते ते खुले होईल.


आता पुन्हा एकदा मोबाईल च्या मुख्य सेटिंग मध्ये या आणि आता तुम्ही पाहाल कि  तुम्हांला  तुमचे Developer Option सेटिंग मध्ये दिसत असेल.


आता आपले महत्वाचे काम चालू होते.

आता मोबाईल च्या मुख्य सेटिंग मध्ये जा त्या नंतर आता जे Developer Option आपण खुले केले ते Open करा.


Developer Option मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे option दिसतील.


  • Window Animation Scale
  • Transition Animation  Scale
  • Animator Duration Scale


असे तीन पर्याय तुम्हाला दिसल्यानंतर पहिल्या पर्याय open करा. Open केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय दिसतील.


  • Animation Scale     Off
  • Animation Scale   . 5x
  • Animation Scale     1x
  • Animation Scale     1.5x
  • Animation Scale     2x
  • Animation Scale     5x
  • Animation Scale     10x


असे पर्याय दिसल्यानंतर त्यातील सर्वात कमी म्हणजे Animation Scale. 5x हे निवडायचे आहे.

याचप्रमाणे तीनही OPTION वरती जाऊन

  1. Window Animation Scale
  2. Transition Animation  Scale
  3. Animator Duration Scale

तुम्हाला सारखीच प्रॉसेस करायची आहे.


हे सर्व झाल्यानंतर तुमचा मोबाईलच्या मुखपृष्ठावर या आणि आपला मोबाईल एकदा पुनर्स्थापित म्हणजेच Restart करा. जेव्हा तुमचा मोबाईल चालू होईल त्या नंतर त्याचे स्पीड 100% वाढलेली तुम्हाला दिसेल.


मित्रानो आशा करतो कि ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स जो या पोस्ट च्या खाली आहे त्या मध्ये आम्हाला तुमच्या शंका विचारा आम्ही त्याचे नक्की उत्तर व समाधान करू.


या पोस्ट ला फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप अश्या सोसिअल मेडियावरती नक्की शेअर करा. धन्यवाद.

3 टिप्पण्या

thank you for your feedback

टिप्पणी पोस्ट करा

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने