कोरोनाचे दिसू लागले नवीन लक्षण, चिंताजनक आहेत ही लक्षणे
संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढलेला दिसत आहे. या बरोबरच भारतात देखील या आजाराचा फैलाव मागील काही दिवसापासून अधिकच आवढलेला दिसत आहे. कोरोनाची संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर पातळीवर पोहचली असतानाच आपल्या चिंतेत आणखी भर टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
भारतामध्ये कोरोना विषाणूने रूपांतर केले असून कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता डेंगू सारखी लक्षणे आता दिसून येत आहेत.या विषाणूंमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होण्याची लक्षणे आता दिसून येऊ लागली आहेत. डेंगू च्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. परंतु आता ही लक्षणे कोरोना बाधित रुग्णांमध्ये देखील दिसून येत आहेत. या रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक कमी होऊन त्या 20 हजारापेक्षा कमी होत आहेत. या संबंधित रुग्णाची डेंगू तपासणी केली असता त्यांना डेंगू नसल्याचे समोर आले आहे. आता या कोरोनाने नवीन रूप धारण केले आहे. आणि ही पूर्ण माहिती अतिशय चिंताजनक आहे. अति महत्वाचे म्हणजे असे कोरोना बाधित रुग्ण हे आजार गंभीर अवस्तेत पोहचल्यानंतर सापडत आहे.
याबाबत अधिक माहिती सांगताना पीजीआय चे प्राध्यापक अनुपम वर्मा यांनी सांगितले की अश्या रुग्णाची प्लेटलेट्स अचानक कमी होत असून अश्या रुग्णांची प्रकृती स्तिर राखणे कठीण आहे.ही अत्यंत चिंताजनक बाब असून आपण आपली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback