धक्कादायक! लग्नाअगोदरचा प्रेम संबंधाचा राग एकाच्या जीवावर बेतला.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

धक्कादायक! लग्नाअगोदरचा प्रेम संबंधाचा राग एकाच्या जीवावर बेतला.


प्रेम संबंध कुणाला काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही, अस्यातच प्रेम एकासोबत आणि लग्न वेगळ्यासोबत झाल्यानंतर मात्र दोन्ही बाजूला सामान भीती असते. कोणी प्रेमापोटी जीव देते तर कोणी जीव घेते. अशीच एक घटना पिंपरी मधील सांगवी येथे घडली आहे. आपल्या पत्नीचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून त्या व्यक्तीच्या प्रियकरावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारल्याची घटना सांगवी येथे घडली आहे.


सांगवी येथे रविवारी दुपारच्या वेळी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ जाधव ( वय -28 )असे खून झालेल्या प्रियकराचे नाव असून. अयाज शेख राहणार शिवाजीनगर पुणे आणि सोन्या बाराथे अशी या खुनाच्या आरोपींची नावे आहेत. या खुनाच्या प्रकरणी सुशांत जाधव ( प्रियकराचा भाऊ ) याने सांगवी पोलीस ठाण्यामध्ये आपली तक्रार नोंदवली  आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, आरोपी आयाज शेख याच्या पत्नीचे लग्नाअगोदर मयत, सौरभ जाधव याच्याशी प्रेमसंबंध होते, याच गोष्टीचा राग आपल्या मनात धरून आरोपी आयाज आणि सोन्या बाराथें या दोघांनी सौरभ जाधव याच्यावर धारधार हत्याराने वार करून त्याला ठार मारले.  



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने