स्वतःचा गळा कापून तरुणाने इमारती वरतून मारली उडी
लोकडाऊन च्या काळात अनेक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या, मग ते ठाणे मधील कोविड सेंटर वर झालेला बलात्कार असो किंवा 5 वर्ष्याच्या मुलीवर केलेला अत्याचार. परंतु अस्यातच एक आणखी धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक 32 वर्षीय तरुणाने स्वतःच्या गळ्यावर चाकू ने वार करून इमारती वरून उडी मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
राहुल रामा सूर्यवंशी रा. विश्रांतवाडी, जि. लातूर असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून to विश्रांतवाडी येथे आपल्या पत्नी सोबत राहत होता. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार लोकडाऊन च्या काळात राहुल ची पत्नी गावी गेली होती. त्यामुळे राहुल घरात एकटाच राहत होता. राहुल नो पार्किंग मधील गाड्यांचे लोड, उनलोड करण्याचे काम करत होता.
रविवारी (दि. 13 ) ला त्याने आपल्या राहत्या घरामध्ये स्वतःच्या गळ्यावरती चाकू ने वार करून अंगावरती सर्व ठिकाणी वार करून जखमा केल्या होत्या, तरी देखील आपला जीव जातं नाही म्हणून त्याने आपल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती विश्रांतवाडी पोलिसांना समजताच घटनास्तळी जाऊन त्याला रुग्णालयात हलवले परंतु जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्या कारणाने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली आहे. राहुल ने असे पाऊल का उचलले याचे कारण अजून समजू शकले नसून, विश्रांतवाडी पोलीस याबाबाद अधिक तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback