संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
एक झाड जगवा आणि हजारो रुपये मिळवा, शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अनुदान.
जुन्या झाडांचे संगोपन व्हावे म्हणून प्रत्येक झाडामागे अनुदान देण्याची योजना राज्यभरात लवकरच जाहीर केली जाणार आहे. यामध्ये एक जुने झाड जगवल्यास शेतकऱ्याला प्रति झाड हजार रुपये अनुदान मिळणार आहे. येणाऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीनंतर ही योजना जाहीर केली जाणार आहे.
शेतामध्ये असलेल्या झाडांची रक्षण व्हावे या उद्देशाने अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून येणाऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार याबद्दल वन विभागाची एक बैठक घेणार असल्याची माहिती अभिमन्यू काळे यांनी दिली आहे. अजित पवार यांनी या अगोदर संबंधित विभागांना पत्र पाठवून बैठकीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सन 2017-18 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान देण्याची ही योजना राबवली गेली होती. आपल्या शेतामध्ये 100 सेंटीमीटर घेर असणाऱ्या झाडांना प्रतिझाड शंभर रुपये, त्याचबरोबर 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त घेर असणाऱ्या झाडांना प्रति झाड एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे स्वरूप होते. ही संबंधित योजना आता संपूर्ण राज्यभर राबविली जाणार आहे. गावांमधील झाडांना देखील योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे. नवीन झाडांची लागवड करण्यासाठी खूप खर्च येतो परंतु जुन्या झाडांना काहीही खर्च नसतो त्यांचे जतन व्हावे म्हणून ही योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback