संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
इथे पोलीसच भक्षक ! बंदुकीचा धाक दाखवून पोलीस निरिक्षकाचा तरुणीवर अत्याचार.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना काळामध्ये डॉक्टर , पोलीस यांना देवदूत मानलं जात असतानाच याच कोरोना योध्यांच्या देखील अनेक घटना समोर येत आहे. आपल्या पदाचा काही लोक गैरवापर देखील करत आहेत, अश्यातच नगर शहरातील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने बंदुकीचा धाक दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी की नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात तात्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर पोलीस अधिकारी हा वादग्रस्त अधिकारी म्हणून प्रचलित आहे. 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने पोलिस ठाण्यामध्ये आलेल्या एका 26 वर्षीय तरुणीबरोबर सदर अधिकारी वाघ यांची ओळख झाली होती. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला होता. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन बंदुकीचा धाक दाखवून त्याने सदर पीडितेवर शारीरिक अत्याचार केला होता.
पीडित तरुणीने यावेळी वाघ याला प्रतिकार केला होता परंतु यामुळे वाघ याने सदर पिडीतेला कंबरपट्टा ने मारहाण केली होती त्याचबरोबर ही गोष्ट इतर कुणाला सांगितली तर संपवून टाकेल अशी धमकी देखील दिली होती. वाग याने यानंतर या पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला होता. अशातच ही तरुणी गरोदर राहिली होती . हि गोष्ट वाघ याच्या लक्षात आल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला बंगल्यावर नेऊन जबर मारहाण करून जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या.
अशा प्रकारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. हि बाब सदर वाघ या अधिकाऱ्याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी देऊन कोऱ्या कागदावरती तिच्या सह्या देखील घेतल्या होत्या. यानंतर सदर अधिकारी वाघ याने 11 सप्टेंबर 2020 रोजी पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरवली पाडावर या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी अत्याचार केल्याची ही दुसरी घटना आहे. असाच काहीसा प्रकार काही दिवसापूर्वीच घडला होता. या घटनेत देखील एक पोलीस निरीक्षक सहभागी होता. कोरोना काळात कोरणा योद्धा म्हणून ओळखले जाणारे अधिकारी जर असे गुन्हे किंवा अपराध करीत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर अधिकार्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback