फास्ट टॅग म्हणजे काय?| FASTAG Information in Marathi.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

फास्ट टॅग म्हणजे काय?| FASTAG Information in Marathi.



    FASTAG Information in Marathi,  फास्ट टॅग हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे टोल कनेक्शन तंत्रज्ञान आहे. वास्तविक पाहता , राष्ट्रीय महामार्गावरून वाहन चालवण्यासाठी सरकार टोल टॅक्स आकारत असतात, टोल टॅक्स वसूल करण्यासाठी सरकारने टोल नाके बसवले आहेत. अगोदर लोक टोल प्लाझा वरती रोख रक्कम देऊन पेमेंट करत होते त्यामुळे आपला वेळ आणि मोठ्या रांगामध्ये आपल्याला उभे राहावे लागत होते , ह्या रांगा आणि कमी वेळ लागावा या उद्देश्याने सरकारने  FASTAG सुविधा चालू केली आहे.

    Fastag हा RFID निष्क्रिय टॅग आहे जो Direct प्रीपेड किंवा Saving /Current खात्याशी जोडलेल्या ग्राहकांकडून टोल संधर्भातील व्यवहार करण्यासाठी वापरला जातो. हे वाहण्याच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या काचेवरती लावलेले असते व आपण टोल प्लाझा वरती गेल्यावर आपोआप ditect करून आपल्या खात्यामधून पैसे वजा होतात आणि आपणास पुढे जाण्यास परवानगी प्राप्त होते.

    चार चाकी वाहन चालकाला त्याच्या वाहनाच्या समोरच्या काचेवरती फास्ट टॅग स्टिकर लावणे बंधनकारक आहे, हा फास्ट टॅग मिळविण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागेल,त्यानंतर तो त्यांच्या वाहनासाठी प्रदान केला जातो. त्याचबरोबर त्यांना टोल प्लाझावर रोख रक्कम द्यावी लागणार नाही.फास्ट टॅग कोड आपोआप स्कॅन होऊन टोल प्लाझा चे मूल्य आपल्या खात्यामधून वजा होत असते.

    Fast-Tag लावण्याचे फायदे.

    • वेळ आणि मोठ्या रांगा लागणार नाहीत.

    Fast tag सुविधा सुरू केल्याने टोल प्लाझा वरती गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागणे कमी होईल आणि लोकांची वेळेची बचत होते.

    • इंधनाची ची बचत 

    Fastag लावल्याने आपला वेळ वाचल्याने आपले पेट्रोल आणि डिझेल ची मोठ्या प्रमाणात बचत होते .

    • प्रदूषण कमी होईल. 

    पेट्रोल आणि डिझेल ची बचत झाल्याने याद्वारे होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण कमी होईल.

    • कॅशबॅक सुविधा .

    Fastag ही सुविधा 4 नोव्हेंबर2014 साली सुरु झाली त्यानंतर 2016-2017 साली या सुविधेचा वापर करणार्‍या व्यक्तींना 10% पर्यंत कॅशबॅक ऑफर दिली जाऊ लागली . त्यानंतर 2017-18 मध्ये 7.5% त्याचबरोबर 2018-19 मध्ये 5%, 2019-20 मध्ये 2.5% इतका कॅशबॅक देण्यात येत होता.आता ही कॅशबॅक ऑफर 2022 मध्ये पुन्हा 10% इतकी करण्यात आली आहे आपण जर 300 रुपयाच्या वरती टोल चे मूल्य दिले तर आपल्याला 10% पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे,हा कॅश बॅक आपल्या Fastag खात्यामध्ये 1 आठवड्यामध्ये वर्ज केला जातो.

    • SMS सुविधा उपलब्ध.

    आपण Fastag लावलेले वाहन कोणत्याही टोल प्लाझा वरुण नेले असता आपल्या नोंदणी केलेल्या मोबाइल वरती पैसे कट झाल्याचा sms येतो.यामुळे आपल्याला FasTag अकाऊंट वरती किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळत असते.

    • मासिक पास सुविधा.

    NHAI (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) ने जी वाहने रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी मासिक पास सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे आपल्याला One Time पेमेंट केल्यावर नंतर एक महिना पेमेंट चेक करण्याची गरज पडत नाही . मासिक पास मुळे पैसा आणि वेळेची बचत होते..

    Fastag काम कसे करते?

    आपले वाहन टोल प्लाझा निकट आल्यावर टोल प्लाझा वरील लावलेले सेन्सर आपल्या गाडीवरील Fastag ला स्कॅन करतात. त्यानंतर Fastag ला सलग्न असलेल्या अकाऊंट वरुण पैसे कट होतात. अशा पद्धतीने टोल प्लाझा वरती बिना थांबता आपण टोलचे देय करू शकतो.  

    तुमचे प्रीपेड खाते सक्रिय होताच हा vheical Maount केलेला टॅग काम करण्यास सुरवात करतो. जेव्हा तुमच्या Fastag खात्यामध्ये असलेली रक्कम शून्य होईल , तेव्हा तुम्हाला रिचार्जे करावे लागेल.

    Fastag चा वापर एका पेक्षा जास्त वाहनांना करता येऊ शकतो का?

    Fastag चा उपयोग एका पेक्षा जास्त वाहनांना करता येत नाही, तुम्हाला प्रत्येक वाहनासाठी वेगळे Fastag कार्ड विकत घ्यावे लागते. 

    Fastag कार्ड चा रीचार्ज कसा करावा ?  

    आपले Fastag कार्ड NHAI प्रीपेड वॉलेटशी जोडलेले असेल तर ते चेकद्वारे किंवा UPI/Debit Card /Credit Card /NEFT/नेट बँकिंग याद्वारे रिचार्ज आपण रिचार्ज करू शकतो. जर आपले बँक खाते Fastag शी लिंक केल्यास थेट खात्यातून पैसे कापले जातात.जर Paytm Wallet फास्टटॅग शी लिंक केले असेल तर थेट वॉलेटमधून पैसे केले जातात. 

    Fastag कार्ड कोठून विकत घायचे? 

    Fastag Stickers राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझा त्याचबरोबर 22 वेगवेगळ्या बँकांमधून खरेदी केले जाऊ शकते . हे Paytm , Amazon आणि Flipkart  सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त  Fino पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील Fastag प्रदान करत असतात.


    आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आणि नवीन उपडेट आपल्या मोबाईल वर विनामूल्य प्राप्त करण्यासाठी आपण आमच्याशी खालील माध्यमाद्वारे जोडले जाऊ शकता.

    What's App ------------»   Join करा.


    Facebook ---------------»  Join करा.


    Telegram -----------------»  Join करा.



    Post a Comment

    thank you for your feedback

    थोडे नवीन जरा जुने