महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न | Police bharti important gk questions in marathi

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

पोलीस भरतीसाठी महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न|Police bharti important gk questions in marathi 




    Police bharti important gk questions in Marathi : पोलिस भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो मुले दरवर्षी तयारी करत असतात आणि ही पोलीस भरती महाराष्ट्रातील सर्वात जास्त मुलांची स्वप्न पूर्ण करणारी भरती आहे. पोलिसमध्ये भरती होण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज चे किती महत्त्व असते हे पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या मुलांना माहिती आहे . म्हणूनच त्या मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलिस भरतीसाठी येणारे महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Police भरती important gk questions in Marathi) जाणून घेणार आहोत.तर चला सुरुवात करूया.

    Police bharti important gk questions in marathi 


    स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
    उत्तर : लॉर्ड रिपन

    डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

    शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे उदगार कोणाचे आहे ?
    उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
    उत्तर : रास बिहारी बोस

    राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
    उत्तर : सर ए. ओ. ह्युम

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
    उत्तर : सरोजिनी नायडू

    राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
    उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी

    काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
    उत्तर : मुंबई

    मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
    उत्तर : महात्मा फुले

    भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
    उत्तर : 26 जानेवारी 1950

    लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असते?
    उत्तर : 552

    राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
    उत्तर : 250

    राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
    उत्तर : 238

    शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
    उत्तर : रायगड

    महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
    उत्तर : 48

    महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
    उत्तर : 19

    भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
    उत्तर : राष्ट्रपती

    Thoughts of Pakistan या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
    उत्तर : कागल

    राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
    उत्तर : राष्ट्रपती

    राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
    उत्तर : सहा वर्षे

    सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
    उत्तर : महात्मा फुले

    मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
    उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

    महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
    उत्तर : तुकडोजी महाराज

    पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
    उत्तर : दर्पण

    भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
    उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे

    राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
    उत्तर : उपराष्ट्रपती

    भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
    उत्तर : दिल्ली

    भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
    उत्तर : 25

    महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
    उत्तर : 288

    महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
    उत्तर : 78

    विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
    उत्तर : स्थायी / कायमस्वरूपी

    भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
    उत्तर : शेती

    रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
    उत्तर : महाराष्ट्र

    दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
    उत्तर : महाराष्ट्र

    एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
    उत्तर : वित्त सचिव

    शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
    उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर

    ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
    उत्तर : राजीव गांधी

    महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
    उत्तर : 1 मे 1962

    ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
    उत्तर : ग्रामसेवक

    Police bharti important general knowledge questions in marathi


    ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
    उत्तर : 7 ते 17

    जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
    उत्तर : पंचायत समिती

    जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
    उत्तर : स्थायी समिती

    गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
    उत्तर : तहसीलदार

    सातबारा उतारा कोण देतो?
    उत्तर : तलाठी

    जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
    उत्तर : जिल्हाधिकारी

    जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
    उत्तर : रातांधळेपणा

    कुत्रा चावला तर यावर्ती वापरण्यात येणारी रेबीज ही लस कोणी शोधून काढली?
    उत्तर : लुई पाश्चर

    डेसीबल हे कशाचे एकक आहे?
    उत्तर : आवाजाची तीव्रता मोजण्याचे

    मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
    उत्तर : 37°c

    गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
    उत्तर : पोलिस पाटील

    महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
    उत्तर : 34

    सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
    उत्तर : आठ

    पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
    उत्तर : एक

    सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
    उत्तर : गुरू

    चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
    उत्तर : नील आर्मस्ट्रॉंग

    पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
    उत्तर : परिवलन

    रिश्टर स्केल काय आहे?
    उत्तर : भूकंप मापक

    दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
    उत्तर : अंटार्टिका

    सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
    उत्तर : पांढऱ्या पेशी

    केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता?
    उत्तर : अर्जुन पुरस्कार

    भारताच्या अनु विज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात?
    उत्तर : डॉ. होमी भाभा

    मॅक् मोहन ही सिमा रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे?
    उत्तर : भारत आणि चीन

    जगातील सर्वात लांब नदी कोणती?
    उत्तर : नाईल

    डॉ.अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
    उत्तर : गडचिरोली

    उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
    उत्तर : शहनाई

    बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
    उत्तर : आसाम

    संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
    उत्तर : 24 ऑक्टोबर.

    PDF File Download करा.


    मित्रानो आशा करतो कि आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कंमेंट नक्की करा. आणि अश्याच आणखी प्रश्न - उत्तरांसाठी आमच्या खाली साईट ला join करा.

    आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आणि नवीन उपडेट आपल्या मोबाईल वर विनामूल्य प्राप्त करण्यासाठी आपण आमच्याशी खालील माध्यमाद्वारे जोडले जाऊ शकता.

    What's App ------------»   Join करा.


    Facebook ---------------»  Join करा.


    Telegram -----------------»  Join करा.



    Post a Comment

    thank you for your feedback

    थोडे नवीन जरा जुने